मराठीतील गाजलेल्या मालिकांबद्दल विषय निघाला, तर ‘लागीर झालं जी’ या मालिकेचं नाव येणार नाही, असं होऊच शकत नाही. या मालिकेने प्रेक्षकांना देशभक्तीच्या आड लपलेल्या प्रेमकथेचे दर्शन घडवून दिले. ‘आज्या’ आणि ‘शितली’ या मुख्य व्यक्तीरेखा प्रचंड गाजल्या. मालिका संपून बराच काळ लोटला असला तरीही, प्रेक्षकांच्या मनात अजूनही यातील पात्रं जिवंत आहेत. शितली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरची लोकप्रियता तर या मालिकेने शिगेला पोहचवली.
अभिनेत्री मालिकेत देसी अंदाजात झळकली होती. तिचा हा सोज्वळपणा प्रेक्षकांकडून खूप पसंत केला गेला. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. सतत तिचे नवनवीन लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऑनस्क्रीनप्रमाणे चाहते ऑफस्क्रीनही तिला भरभरून प्रेम देतात. नुकतेच अभिनेत्रीने पोस्ट केलेला फोटो आता मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे.
शिवानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीमध्ये शिवानीचं सौंदर्य खुललं आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. यातील तिच्या अदा चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडत आहेत. या फोटोतील अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
हा ग्लॅमरस फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “ये हवायें, गुनगुनाए, पूछे तू है कहाँ.” शिवानीचा गुलाबी अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लाल हार्ट ईमोजीचा पाऊस पडला आहे. बघता बघताच या फोटोवर २८ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-महाकठीण! ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का? कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज
-‘या’ कलाकारांनी दिला होता ‘जेठालाल’च्या पात्रासाठी नकार; राजपाल यादवचाही आहे यादीत समावेश
-भूषण कुमार याच्यावर बलात्काराची केस दाखल; आता टी-सीरिजने वक्तव्य जाहीर करत दिली ‘अशी’ प्रतिक्रिया