Saturday, July 27, 2024

कपिल शर्माला शोमध्ये ‘हा’ शब्द वापरण्यास केली मनाई; कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

कपिल शर्मा अलीकडेच करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या शोमध्ये दिसला. यादरम्यान कपिलने करिनाच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली, ज्यामध्ये तिने शाेशी संबंधित आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘ज्विगाटो’ चित्रपटासंबधी प्रश्न विचारली हाेती. कपिलने शोमध्ये भारतातील कॉमेडीची सद्यस्थिती आणि विनोदी कलाकारांना त्यांच्या शब्दांमध्ये कशी काळजी घ्यावी लागते याबद्दलही सांगितले.

करीना कपूर (Kareena Kapoor) हिने कपिल शर्मा (kapil sharma) याला तिचा शो ‘व्हाॅट वुमन वाॅन्ट’मध्ये विचारले, “आम्ही एक समाज म्हणून विकसित होत आहोत, ज्या कॉमेडीला 10 वर्षांपूर्वी विनोदी मानायचे, आता लोकांना ते खूप वाईट वाटू लागले आहे. म्हणून जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट लिहिता किंवा तुमच्या टीमसोबत बसता तेव्हा तुम्ही लक्षात ठेवता का की, आपण अशा प्रकारची चेष्टा करू शकत नाही?”

करीनाच्या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणाला, “प्रामाणिकपणे असे बरेच काही घडते, मी पंजाबच्या अमृतसर येथून आलो आहे, आमच्या संस्कृतीत असे आहे की, वराची मंडळी अनेकदा वधूच्या मंडळींची चेष्टा करते. तिथले लोक त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. या सर्व गोष्टी आमच्या संस्कृतीचा भाग होत्या, पण आज लोक याला बॉडी शेमिंग म्हणतात. तुम्ही जीईसी चॅनेलवर काम करता तेव्हा तुम्हाला अशा शब्दांवर एसएनपी दिले जाते, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. या क्षणी मला चॅनलने सांगितले की, मी ‘पागल’ हा शब्द वापरू शकत नाही. मला ते समजले नाही आणि मी त्यांना विचारले का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘यामुळे लोक नाराज होतात’.” असे कपिल शर्माने करीनाच्या शाेमध्ये सांगितले.(sony channel refused to call actor kapil sharma mad in the show the comedian said we are going backwards)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हाेणाऱ्या जावायासाेबत बाेनी कपूर यांनी दिली पाेज? एकदा ‘ताे’ व्हिडिओ पाहाच

वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले! अभिनेत्री राधिका देशपांडेने ‘त्या’ पोस्टमधून व्यक्त केली मायलेकीच्या नात्याची वीण

हे देखील वाचा