Monday, October 14, 2024
Home मराठी वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले! अभिनेत्री राधिका देशपांडेने ‘त्या’ पोस्टमधून व्यक्त केली मायलेकीच्या नात्याची वीण

वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले! अभिनेत्री राधिका देशपांडेने ‘त्या’ पोस्टमधून व्यक्त केली मायलेकीच्या नात्याची वीण

आई कुठे काय करते? या मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवली आहे. सतत टॉपवर असलेल्या या मालिकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला या मालिकेने नवी ओळख दिली. याच मालिकेत ‘देविका’ (अरुंधतीची मैत्रीण) हे पात्र साकारणारी अभिनेत्री राधिका देशपांडे सध्या खूपच चर्चेत आली आहे. तिचे चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट. 

राधिका मराठी मनोरंजनविश्वातील ओळखीचा चेहरा आहे. तिने होणार सून मी या घरची मालिकेत देखील भूमिका साकारली होती. राधिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट तिच्या मुलींसाठी शेअर केली आहे. अतिशय शुल्लक असला तरी त्यात आई तिच्या प्रेमाने त्याला किती महत्व देते हेच तिच्या पोस्ट मधून लक्षात येईल. शाळेला सुट्टी लागल्यानंतर मुलीची वेणी घालता येणार नाही. ही वेणी घालण्यामध्ये एका आईला किती सुख मिळते, त्यात ती काय काय गुंफत असते आदी अनेक गोष्टी राधिकाने अतिशय सुंदर व्यक्त केल्या आहेत.

राधिका देशपांडेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ““प्रिय बबुष्का,
आज तुझा शाळेतला शेवटचा दिवस. आणि मला रडायला येतं आहे. रोजच्या दिनचर्येतलं एक काम म्हणजे वळणदार छानशी वेणी घाळणे.
“आईईई वेणी घालून दे”
“अंतरा फणी जागेवर ठेवत जा गं”
“आई चल पटकन किती वेळ लावते आहेस”
थांब ग जरा, हलू नकोस, वेणी नीट येत नाही मग”

तीन पदरी वेणीत वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले आहे मी आजवर. शेवटची पेड गुंफते आहे. त्याला रबर बैंड लावते आहे. स्वच्छ फणी, घट्ट वेणी, वर्षानुवर्ष वेळेत घातलेली, कधी आवडती, कधी नावडती वेणी…हे सगळं आज थांबणार.
एक वळण मला दिसतंय अंतरा. उद्यापासून शाळा नाही. आपला संवाद नाही. वेणी नाही का फणी नाही. तुझ्या आईला रडायला येतं आहे कारण वळण आलं आहे. गाडी सुटल्या सारखं वाटतंय, डबा हरवल्यासारखा वाटतो आहे… पण…पण मी रडले नाही. चेहऱ्याकडे बघ माझ्या दिसते आहे मी रडल्यासारखी? आईनं मुलगी शाळेत जाताना चेहरा हसराच ठेवायचा असतो. नियमच आहे तसा.”

हे सगळं मी तुला बोलून दाखवलं नाही. पण तुला ते कळलं असणार. केसांवरून फिरवलेल्या फणीनं ते सांगितलं असणार. बाकी आजची वेणी वळणदार होती ह्यात शंकाच नाही. अंतरा तू शाळेत वेळेत पोहोचली! मुलगी शिकली. मुलगी मोठी झाली. आई मात्र लहानच राहिली… असो.

तुझी… तुझीच,
आई

राधिकाच्या ही पोस्ट चांगलीच गाजत असून, अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यावर कमेंट करत लिहिले, “खुपच सुरेख लिहीलयस राधा…” तर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिचे कौतुक केले. तर अनेक स्त्रियांनी त्यांच्याच मनातील भावना व्यक्त केल्या असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अभिनेत्री राधिका देशपांडे एक उत्तम अभिनेत्रीसोबतच लेखिका, बालनाट्य दिग्दर्शका आणि राधिका क्रिएशन्सची निर्माती तसेच निवेदिका आहे. राधिका देशपांडे सोशल मीडियावरही प्रचंड ऍक्टिव्ह असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा