Friday, July 5, 2024

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ चित्रपट देतोय जबरदस्त टक्कर, पाहा दोन्ही चित्रपटांची कमाई

चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर अनेक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये सुपरस्टार अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्या चित्रपटांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, अक्षयचा ‘सूर्यवंशी’ आणि रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ एकमेकांना टक्कर देताना दिसत आहे. या दोन्ही चित्रपटांनी काही दिवसातच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटांबाबत…

अक्षय आणि कॅटरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट धूमधडाक्यात सुरू आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी धमाका केल्यानंतर आता ‘सूर्यवंशी’ने ३ दिवसांत ७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. खरं तर, ट्रेड ऍनालिस्ट मनोबाला विजयबालन यांच्यानुसार, ‘सूर्यवंशी’ने ७५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

मनोबाला यांनी ट्वीट केले की, “सूर्यवंशीचे वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन ७५ कोटींच्या पुढे आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात २६.३८ कोटी, दुसऱ्या दिवशी २४.५३ कोटींची कमाई केली. त्याचवेळी, भारत ग्रॉसने पहिल्या दिवशी ३१.४० कोटी आणि दुसऱ्या दिवशी २९.१६ कोटींची कमाई केली. ओव्हरसीज या चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.१० कोटी आणि दुसऱ्या दिवशी ८.५८ कोटींची कमाई केली. वर्ल्डवाईड ग्रॉस चित्रपटाने ७७.२४ कोटींची कमाई केली आहे.”

अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला ‘अन्नाथे’ चित्रपट देतोय टक्कर
रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाला अक्षयच्या ‘सूर्यवंशी’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘इटर्नल्स’शी स्पर्धा देत आहे, परंतु आश्चर्यकारक आकडेवारी समोर येत आहे. त्यानुसार रजनीकांत यांचा चित्रपट आघाडीवर दिसत आहे. ट्रेड ऍनालिस्ट मनोबाला विजेबालन यांनी यांनी एका ट्वीटमध्ये सांगितले होते की, हा चित्रपट ३ दिवसांनंतर १४६ कोटी रुपयांच्या कमाईपर्यंत पोहोचला आहे.

हा चित्रपट पुढे जाऊन अनेक विक्रम करणार आहे. त्याच्या कमाईचा वेग झपाट्याने वाढत आहे. रजनीकांत अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचे सर्वाधिक चित्रपट १०० कोटींहून अधिक कमावतात. दक्षिणेत त्यांची देवासारखी पूजा केली जाते.

रजनीकांत यांच्या या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता कीर्ती सुरेशही मुख्य भूमिकेत काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिरूथाई सिवा यांनी केले आहे. हा चित्रपट एक फॅमिली ऍक्शन ड्रामा आहे. ज्यामध्ये भाऊ-बहिणीचे नाते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटापूर्वी रजनीकांत ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘दरबार’ या चित्रपटात दिसले होते. तो चित्रपट एक वर्षापूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि आता वर्षभरानंतर पुन्हा रजनीकांत यांनी त्यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

-कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल

हे देखील वाचा