Tuesday, June 18, 2024

पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ, ‘मेरे यारा’ गाण्याचा टिझर प्रदर्शित

बॉलिवूड हे जेवढे चित्रपटांमुळे ओळखले जाते तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ते गाण्यांमुळे ओळखले जाते. चित्रपटाची कथा कितीही खराब असली आणि त्या सिनेमातील गाणी उत्तम असतील तर तो सिनेमा केवळ गाण्यांच्या जोरावरही सुपरहिट होतो. याचा अर्थ असा की संगीत आणि गाण्यांमध्ये सिनेमा हिट करण्याची ताकद आहे. कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला की, प्रेक्षकांना उत्सुकता असते त्या सिनेमातील गाण्यांची. गाण्यांवरून देखील सिनेमा हिट होणार की नाही हे ठरवले जाते. यासोबतच गाणी हा देखील प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्याचा एक उत्तम मार्ग असतो.

सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाच्या चर्चा आहेत, आणि तो सिनेमा म्हणजे ‘सूर्यवंशी’. अक्षय कुमार, कॅटरिना कैफ यांचा हा सिनेमा ५ नोव्हेंबरला दिवाळीच्या मूहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मागच्यावर्षीच प्रदर्शित झाला होता. बऱ्याच दिवसांनी कॅटरिना आणि अक्षय कुमारची सुपरहिट जोडी पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने त्यांचे फॅन्स प्रचंड उत्सुक आहेत.

तत्पूर्वी या सिनेमातील पाहिले गाणे ‘मेरे यारा’चा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्यातून कॅटरिना आणि अक्षय यांची रोमॅंटिक केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. फक्त २५ सेकंदाच्या या टिझरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये दिसणारी लोकेशन अप्रतिम असून, कॅटरिना आणि अक्षय देखील खूपच छान दिसत आहे. हा टिझर पहिल्यानंतर प्रेक्षकांची या गाण्याबद्दल असणारी उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या गाण्याचा टिझर अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला असून, कॅटरिनाने हा टिझर शेअर करताना लिहिले, “अरिजित सिंग आणि नीती मोहन यांच्या सुंदर आवाजातील मेरे यारा हे उद्या प्रदर्शित होणार आहे.” अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ हे दोघे १० वर्षांनी एकत्र दिसणार आहे. २०१० साली आलेल्या ‘तीस मार खान’मध्ये ते शेवटचे सोबत दिसले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगण आणि रणवीर सिंग पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा