Tuesday, October 14, 2025
Home हॉलीवूड सोफी टर्नर दुसऱ्यांदा घेणार मातृत्वाचा आनंद, बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो झाले व्हायरल

सोफी टर्नर दुसऱ्यांदा घेणार मातृत्वाचा आनंद, बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो झाले व्हायरल

हॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे अभिनेत्री सोफे टर्नर आणि गायक जो जोनास लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत. त्यांना आधी एक मुलगी देखील आहे. तिचे नाव विला जोनास हे आहे. अशातच दोन वर्षानंतरच ते दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार जो आणि सोफी खूप खुश आहेत. ते त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहेत. त्या दोघानांही भाऊ बहीण आहेत, त्यामुळे त्यांना असे वाटते की, त्यांच्या मुलीला देखील भावंडं असावं. त्यांनी जोच्या वाढदिवशी ही बातमी देऊन पार्टी देखील केली आहे. (sophie turner is going to become a mother for second time pictures with baby bump went viral)

मागील एकही महिन्यांपूर्वी सोफी आणि जो फिरायला गेले होते. यावेळी ते लॉस एंजेलिसमध्ये गेले होते. त्यावेळी तिचे काही खास फोटो समोर आले होते. ज्यात तिचे बेबी बंप दिसत होते. हे फोटो सोशल मीडियावर देखील वेगाने व्हायरल झाले होते. तिथूनच ती प्रेग्नेंट असल्याची माहिती सगळ्यांना समजली होती.

सोफी आणि जोने २०१६ साली डेटिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी लग्न केले. २०२० मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलीला जन्म दिला. तसेच ते त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहेत.

जो आणि सोफी साधी निक आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी सरोगसी द्वारे आई वडील झाले आहेत. त्यांना मुलगी झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दली होती. आता सोफी देखील आई होणार आहे. या बातमीने संपूर्ण हॉलिवूड इंडस्ट्री खुश आहे.

हेही वाचा  :

हे देखील वाचा