HBD : ‘तुम्ही सर्वात मोठे फ्रॉड आहात…’, म्हणत जेव्हा अनुपम यांनी महेश भट्ट यांना दिला होता शाप

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांचे नाव कमावले आहे. अनेक चित्रपटात काम करून त्यांनी त्यांचे स्थान निर्माण केले आहे. यातीलच एक नाव म्हणजे अनुपम खेर. त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि अजूनही त्यांनी त्यांच्या मनोरंजनात सातत्य ठेवले आहे. अशातच अनुपम खेर हे सोमवारी (६ मार्च) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील एक खास किस्सा.

अनुपम खेर (anupam kher) यांची गणना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्यांनी महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्या काळात ते केवळ २४ वर्षांचे होते. त्यांनी एका वृद्ध वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र, त्यांच्या या भूमिकेतून ते प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आले. अनुपम खेर यांना बऱ्याच अडचणींनंतर ही भूमिका मिळाली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, महेश भट्ट यांच्यामुळे ते निराश झाले होते आणि तेव्हा त्यांनी मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यापूर्वी त्यांना महेश भट्ट यांना चांगलाच धडा शिकवायचा होता. (anupam kher birtday special : lets know about his life)

खरं तर, अभिनेते अनुपम खेर यांनी १९८४च्या ‘सारांश’ चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २५ मे, १९८४रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र, त्यांनी १९८२ मध्ये ‘आगमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, परंतु ‘सारांश’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. यानंतर त्यांच्या यशाचा रथ धावतच राहिला. अनुपम यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक अशा चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केली.

‘सारांश’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, पण त्यावेळी अनुपम यांना चित्रपटातून बाहेर फेकले गेले होते. अनुपम यांनी ‘सारांश’साठी सहा महिने कठोर परिश्रम घेऊन तयारी केली होती, पण शेवटच्या क्षणी महेश भट्ट यांनी त्यांना काढून संजीव कुमारला ठेवले. यानंतर अनुपम यांना धक्का बसला आणि त्यांनी मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधी ते महेश भट्टच्या घरी गेला आणि रडत रडत त्यांना शापही दिला. नंतर महेश भट्ट यांनी अनुपम यांना सिलेक्ट केले.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम म्हणाले, “मी खूप घाबरलो होतो. मला वाटलं होतं की, मी या शहरासाठी लायक नाही. मी माझे सामान बांधले होते आणि मी मुंबई कायमची सोडून जाणार होतो, पण मुंबई सोडण्यापूर्वी मी महेश भट्ट यांच्या घरी गेलो. मी त्यांच्या घरी पोहोचलो. मी बेल वाजवली आणि महेशजींनी दार उघडले आणि म्हणाले, ही चांगली गोष्ट घडली की, तुम्ही आलात. तुम्हाला दुसरी भूमिका साकारावी लागणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “संजीव कुमार ती भूमिका साकात आहेत. तुमची भूमिका मोठी नाही, पण तुमची भूमिका लक्षात राहण्यासारखीच आहे.” यावर अनुपम म्हणाले, “महेशजी तुम्ही बाहेर या. तिथे माझी टॅक्सी उभी आहे. त्यात माझे सामान आहे, मी हे शहर सोडत आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही सर्वात मोठे फसवणूकदार आहात. तुम्हाला सत्यावर आधारित चित्रपट करायचा आहे, पण तुमच्या चित्रपटात सत्य काहीच नाही.”

यानंतर महेश यांनी अनुपम यांना खिडकीतून हाक मारली आणि सांगितले की, ते निर्मात्यांना बोलवत आहेत. तसेच त्यांनी अलीकडेच ‘सीन’ पाहिला होता आणि अनुपम ही भूमिका चांगली करतील याची त्यांना खात्री पटली होती, असेही ते म्हणाले. अनुपम यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘स्पेशल २६’, ‘हम आपके हैं कौन’, ‘विवाह’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

 हेही वाचा :

Latest Post