‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्रीने दीपिकाच्या ‘घुमर’ गाण्यावर लावले ठुमके, व्हिडिओला मिळतोय चांगलाच प्रतिसाद

लोकप्रिय ‘भाभी जी घर पर है’ मालिकेची माजी अभिनेत्री सौम्या टंडनला तर आपण ओळखत असालंच. तिने हा कार्यक्रम सोडून थोडाच वेळ झाला असला तरीही तिच्या लोकप्रियतेवर परिणाम झालेला नाही. ‘भाभी जी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत अनिता नारायण मिश्राची भूमिका साकारत सौम्या टंडनने सर्वांच्या हृदयात आपले एक खास स्थान निर्माण केले.

यात ती विभूती नारायणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. हल्ली सोशल मीडियावर तिचा डान्स व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये सौम्या ‘पद्मावत’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘घुमर’वर डान्स करताना दिसत आहे. सौम्या टंडनने हा डान्सचा व्हिडिओ तिच्या यूट्यूबवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये आपण सौम्याच्या उत्कृष्ट हावभावांसह एक उत्कृष्ट नृत्य पाहू शकता. या व्हिडिओला काही दिवसातंच लाखो व्ह्यूज मिळाले. हा व्हिडिओ 23 जानेवारी रोजी पोस्ट केला गेला होता. आतापर्यंत या व्हिडिओला 25 हजार लाईक्स मिळाले आहेत.

‘पद्मावत’ चित्रपटातील हे गाणे दीपिका पदुकोणवर चित्रीत करण्यात आले होते. त्यानंतर दीपिकाचा ‘घुमर’ डान्स बराच लोकप्रिय झाला होता.

सौम्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर सौम्या टंडन पहिल्यांदा टीव्ही शो ‘ऐसा देश है मेरा’ मध्ये दिसली होती. यानंतर, सौम्या ‘मेरी आवाज को मिल गयी रोशनी’, ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’, ‘मल्लिका-ए-किचन ऑन एअर’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ यांसारख्या शोचा देखील भाग झाली होती. याशिवाय 2008 मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या सुपरहिट फिल्म ‘जब वी मेट’मध्ये सौम्याने काम केले आहे. या चित्रपटात करीना कपूर आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते.

हेही वाचा-

अमेरिकन गायिका मायली सायरसने दाखवले जबरदस्त ‘ऍब्स’, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

गुरु रंधावाच्या ‘या’ गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात

Leave A Reply

Your email address will not be published.