अमेरिकन गायिका मायली सायरसने दाखवले जबरदस्त ‘ऍब्स’, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल


अमेरिकन गायिका मायली सायरसने नुकताच आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गायिका आपले अ‍ॅब्स दाखवताना दिसत आहे. व्हिडिओद्वारे तिने आपली हॉट बॉडी चाहत्यांसमोर सादर केली आहे. यावेळी, ती व्हिडिओ झूम करून तिचे अ‍ॅब्स चाहत्यांना दाखवत आहे. भलेही गायिकेने अ‍ॅब्स दाखविण्यासाठी हा व्हिडिओ सादर केला आहे, परंतु या वेळी तिची मादक शैली देखील चाहत्यांना पाहायला मिळत आहे. मायली सायरस नेहमीच सोशल मीडियावर आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या वेळी आता ती आपल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नॅशनल फुटबॉल लीग- सुपर बाऊलच्या वार्षिक चॅम्पियनशिप गेममध्ये आपल्या कामगिरीच्या दोन दिवस आधी तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती टू-पीसमध्ये दिसली आहे. मायलीने यामध्ये काळ्या रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. मायलीचा हा व्हिडिओ जलदगतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहते या व्हिडिओवर विविध प्रकारे कमेंट करत आहेत.

मायलीचा सेक्सी व्हिडिओ
हा व्हिडिओ आरशात सेल्फ-शॉट शैलीमध्ये शूट करण्यात आला आहे. मायलीचे अ‍ॅब्स व तंदुरूस्त शरीर चाहत्यांचा वेड लावत आहे. यासोबतच तिच्या शरीरावरचे टॅटूही चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओमध्ये मायलीची एक वेगळीच स्टाईल चाहत्यांना पाहायला मिळाली.

फ्लोरिडाच्या टॅम्पा येथील रेमंड जेम्स स्टेडियमवर नॅशनल फुटबॉल लीगच्या अगोदर टिकटॉक टेलगेट हा कार्यक्रम होणार आहे. 7 फेब्रुवारीला होणाऱ्या या कार्यक्रमात मायली देखील दिसणार आहे.

मायली सायरसने असा दावा केला होता की, मी एलियन्सना भेटले. या दाव्यामुळे मायली चर्चेत आली होती. मात्र, हे बोलल्यानंतर तिने सांगितले होते, की त्यावेळी तिची मन:स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे तिने जे पाहिले ते खरे होते की नाही हे सांगता येणार नाही. मायलीने असेही सांगितले होतेे, की ती जवळजवळ पाच दिवस घाबरलेली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.