Tuesday, May 28, 2024

दुःखद! प्रसिद्ध टाॅलिवूड अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

मनोरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. साऊथचे अभिनेता सी.व्ही. देव यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्यामुळे सर्वत्र शोककाळा पसरली आहे. अभिनेता सीव्ही देव यांनी 26 जूनला अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. निधनाची बातमी कळताच त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत.

सोशल मीडियावर लोक अभिनेते सी.व्ही. देव (C V Dev Death) यांच्या निधनाबाद शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता सीव्ही देव यांनी 100 हून अधिक चित्रपट आणि अनेक नाटकांमध्ये काम केले होते. त्यांच्या जाण्याने मल्याळम इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने मल्याळम इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सी.व्ही. देव गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार आजारी होते. नुकतीच त्यांची प्रकृतीअचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. ते हृदयाच्या आजाराशी सुद्धा झुंज देत होते.

सीव्ही देव यांनी 1959 मध्ये ‘विलाक्किन्ते वेलीचाथिल’ या मल्याळम नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा जन्म 1940 मध्ये चमारथूर येथे झाला होता. त्यांनी ‘साध्याम’, ‘ई पुझायुम कदन्नू’, ‘मिझी रांडीलम’, ‘चंद्रोलसवम’ या चित्रपटांमध्ये काम केल आहे.

यादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडला चांगलच ग्रहण लागले आहे. 25 जूनला अभिनेता सूरज कुमार उर्फ ​​ध्रुवनची म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. म्हैसूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या अपघातात सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डाॅक्टरांना अभिनेत्याचा पाय कापावा लागला. (South actor C.V. Dev has passed away.)

(हि बातमी अपडेट होत आहे.) 

अधिक वाचा- 
अभिनेत्री कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, ‘हे नात टिकवण्यासाठी ..’
Birthday | आरजेची नोकरी सोडून बनली यूट्यूबर, ‘असा’ मिळाला प्राजक्ता कोळीला बॉलिवूडमधील मोठा चित्रपट

हे देखील वाचा