Tuesday, May 28, 2024

धक्कादायक! लग्न 5 दिवसांवर आलं असताना नागा शौर्याची प्रकृती बिघडली

कृष्ण वृंदा विहारी आणि लक्ष्य यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारा नागा शौर्य याच्याबाबत एक माेठी बातमी समाेर येत आहे. नागा सोमवारी (14 नाेव्हेंबर)ला एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बेशुद्ध पडला. नागा ‘NH 24’ चे शूटिंग करत होते. नागा अचानक बेशुद्ध पडताच सेटवर उपस्थित सर्वजण घाबरले आणि अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माध्यमातील वृत्तानुसार, नागा शौर्य (Naga Shaurya)  सेटवर हाय ग्रेड व्हायरल फिव्हर आणि डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडला. ‘NH 24’ मधील भूमिकेसाठी तो स्ट्रिक्ट नॉन लिक्विड आहार घेत होता. त्यांना एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये दाखल करण्यात आले. त्याचवेळी, असे देखील बोलले जात आहे की, चित्रपट निर्मात्यांनी त्याचे मसल्स दाखवण्यासाठी काही दिवस त्याला डिहाइड्रेट केले होते. त्याच वेळी, त्याच्यामध्ये मिनरल्सची कमतरता असल्यामुळे, त्याला अशक्त आणि चक्कर आल्यासारखे वाटले. सध्या नागा यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की, “काळजी करण्यासारखे काही नाही आणि एकदा त्याची लेवल स्टेबल झाली की, तो बरा होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Naga Shaurya (@nagashaurya_universe)

या महिन्यात 20 नोव्हेंबरला नागा शौर्य त्याची गर्लफ्रेंड अनुषा शेट्टीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अनुषा बंगळुरूमध्ये राहते आणि व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर आहे. नुकताच त्यांच्या लग्नाच्या कार्डचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये नागा आणि अनुषाचे लग्न केव्हा आणि कुठे होणार आहे हे सांगितले आहे. 19 नोव्हेंबरपासून नागाच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू होईल, ज्यामध्ये हळद, मेहंदी आणि संगीताचा समावेश आहे. दुसरीकडे, 20 तारखेला हे जोडपे पूर्ण विधीसह सात फेरे घेणार आहेत. इतकेच नाही तर, लग्नपत्रिकेत दोघांचा वेडिंग ड्रेस कोडही देण्यात आला आहे. (south actor naga shaurya faints on ns24 set during shooting due to dehydration before marriage with anusha shetty)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा अभिनयाला राम राम, सांगितलं ‘हे’ मोठं कारण

‘सेल्फी विद पीएम मोदी;’ म्हणत तारकता का उल्टा चष्मा फेम सुंदरच्या पोस्टने वेधले लक्ष

हे देखील वाचा