Friday, May 24, 2024

‘सेल्फी विद पीएम मोदी;’ म्हणत तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सुंदरच्या पोस्टने वेधले लक्ष

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ फेम प्रसिद्ध कलाकार मयूर वकानी याने मालितकेमध्ये दयाबेन हिचा भाऊ म्हणजेच सुंदर या भूमिकेमुळे तो घराघरा पोहोचला. या मालिकेती अनेक भूमिका आहेत ज्यांनी लोकांना पोटधरुन हसण्याला भाग पाडला होता. त्यापैकीच सुंदर देखिल आपला मेवना जेठालाल याला सतत पैशामुळे त्रास देऊन ठेवत असतो, नाहीतर असे कृत्य करतो ज्याचा जेठालालला अतोनात राग येत असतो. यावेळेस त्याने असे काही कृत्या केले आहे ज्यामुळे जेठालालच नाही तर अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

नुकतंच गुजरात राज्यामध्ये निवणुका पार पडल्या आहेत मात्र, या सगळ्यामध्ये ‘तारक मेहता फेम’ (Tarak Mehata Ka Ulta Chashma) सुंदर म्हणजेच मयुर वकानी (Mayur Vakani) याने अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्याने मालिकामध्ये ज्याप्रकारे भूमिका निभवली आहे त्याच प्रकारे त्याने आपल्या कौशल्याचा उपयोग वैयक्तीक आयुष्यातही केला आहे. सुंदरकडे अभिनयाव्यतिरिक्त अजूनही कौशल आहेत. त्याचाच  उपयोग करुन त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सुंदरनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayur Vakani (@mayur_vakaniofficial)

मयुर याने आपल्या कौशल्याचा उपयोग करुन हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा बनवला आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांसह पुतळ्यासोबतचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तो आपल्या टीमसोबत पुतळ्यावर काम करत असताान दिसून येत आहे. त्या पुतळ्याला नरेंद्र मोदीसारखेच निळ्या रंगाचा जॅकिट आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. अभिनेत्याने हा पुतळा आपल्या सहकाऱ्यांसह बनवून याच्यासोबत सेल्फी घेऊन फोटो शेअर कॅप्शनमध्ये लिहिले की, “सेल्फी विद पीएम मोदी.”

मयीरचे हे टॅलेंट पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याची कौतुक केले आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “मयूर भाई खूप चांगले काम करत आहात.” ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये तो सतत जेठालाल पैसे मागत असतो म्हणून एका युजरने त्याच्या भूमिकेला आनुसरुन एक कमेंट केली आहे की, “जेठालालकडून पुतळा बनवण्यासाठी पैसे घेतले असणार.” तर दुसऱ्यांनं म्हटलंय की, “आदी जेठालाल याला टोपी लावायचास आणि आता मोदिजींना.”

अशाप्रकारे सुंदरच्या पस्टवर कमेंटचा वर्षाव होत असून अनेक प्रेक्षकांचे त्याचे पोस्ट लक्ष वेधले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा अभिनयाला राम राम, सांगितलं ‘हे’ मोठं कारणमहेश बाबूवर कोसळलंय दु:खाचं डोंगर, आधी भाऊ मग आई आणि आता वडिलांनी सोडली साथ

हे देखील वाचा