Monday, July 1, 2024

सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नागार्जुन यांची सून समंथा अक्किनेनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. अशा परिस्थितीत आता तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती ऍब्ज दाखवताना दिसत आहे.

अभिनेत्री समंथा अक्किनेनीने तिचे फोटोशूट इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. तिचे हे फोटोशूट प्रमोशनल आहेत. यामध्ये ती एका बॅगचे प्रमोशन करताना दिसत आहे. केवळ बॅगच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने आपले फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत आणि फक्त एका तासात त्याला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तिचे हे फोटो भन्नाट व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण तिला ‘फिटनेस फ्रिक’ म्हणत आहेत. समंथाने हातात घेतलेली बॅग लुई विटनची आहे. ज्याची किंमत सुमारे ८५ हजार आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या बॅगची किमान किंमत २९ हजारांच्या जवळपास आहे.

समंथा अक्किनेनी यापूर्वी पती नागा चैतन्यसोबतच्या नात्यामुळे बरीच चर्चेत राहिली होती. जेव्हा समंथाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अक्किनेनी हे नाव काढून टाकले, तेव्हा तिच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या चर्चेला उधाण आले. पूर्वी अभिनेत्री मित्रांसोबत गोवा दौऱ्यावर गेली होती, तेव्हा या चर्चांना चांगलेच तोंड फुटले. यावेळी नागा चैतन्य तिच्यासोबत नव्हता.

‘द फॅमिली मॅन २’ फेम अभिनेत्रीनेही या अहवालांवर माध्यमांवर संताप व्यक्त केला आणि त्यांची तुलना कुत्र्यांशी केली. आता प्रकरण शांत होताना दिसत आहे. ‘द फॅमिली मॅन २’ मधील तमिळ अभिनेत्री समंथा अक्किनेनीच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या बळावर या अभिनेत्रीने लाखो चाहत्यांना वेड लावले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग: दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या आईने घेतला जगाचा निरोप, आज सकाळी झाले निधन

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा