शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची आतुरता अखेर संपली. बुधवार (दि, 25 जानेवीरी) रोजी पठाण प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांनी सिनेमागृहाच्या बाहेर राडा घाताल होता. पहिल्याच दिवशी चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांचा आनंद गनात मावेनासा झाला असून सिनेमागृहाच्या बाहेर चाहत्यांनी ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या गजरात चित्रपटाचं दणक्यात स्वागत केलं. अशातच प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पठाण चित्रपटाला बाॉयकॉट करणऱ्यांसाठी ट्वीट शेअर केलं आहे.
दक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडणारे आणि खलनायकी भूमिकासांठी ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj), हे चित्रपटांसोबतबी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात.सामाजिक मुद्दे, विशेष करून मोदी सरकारवर ते कायमच टीका करत असतात. त्यांनी अशातच
शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाला बॉयकॉट करणाऱ्यांसाठी ट्वीट शेअर केलं आहे ज्यामुळे अभिनेता खुपच चर्चेत आहेत.
प्रकाश राज यांनी ट्वीट शेअर करत लिहिले की, “बॉयकॉट करणाऱ्यांनो shhh, किंग खान परत आला आहे. कीप रॉकिंग दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि पठाणची संपूर्ण टीम.” पठाण चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यावदीचा गल्ला जमवला होता. अशातच चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवरील अनेक रेॉकॉर्ड देखिल मोडीत काढले आहेत. त्याशिवाय अनेक चाहते शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर परतल्याचा आनंद लुटत असल्याने चाहत्यांनी पहिल्याच दिवशी थिएटरच्या बाहेर राडा घातला होता.
Hey #BoycotBigots Shhhhhhhhh … #HallaBol King Khan @iamsrk is back.. keep rocking @deepikapadukone #JohnAbraham and team #Pathan ..#BesharamRang ????????????????????
— Prakash Raj (@prakashraaj) January 25, 2023
‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायाल मिळत आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक देखिल पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये अजूनच गर्दी करत आहेत. त्याशिवाय चित्रपटाच्या पहिल्याच वशी कमाइचा आकडाही नेटकऱ्यांना हैरण करुन सोडणारा आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या टिझरमध्ये दिसलेली शहनाज गिल गेली चांगलीच भाव खाऊन
Republic Day 2023 : महाराष्ट्राच्या चित्ररथात दिसली साडेतीन शक्तीपिठे, मराठमोठ्या गायकाचा घुमला आवाज