Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड बाहुबलीचा बल्लाळदेव दिसणार ‘हाती मेरे साथी’ सिनेमात, चित्रपटाचा जबराट ट्रेलर झाला रिलीझ

बाहुबलीचा बल्लाळदेव दिसणार ‘हाती मेरे साथी’ सिनेमात, चित्रपटाचा जबराट ट्रेलर झाला रिलीझ

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून राणा दग्गुबती हा अभिनेता प्रचंड लोकप्रिय झाला होता. केवळ अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्स्टस डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे. राणाने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात सन २०१० मध्ये केली. त्यानंतर ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून त्याने पदार्पण केले. सोबतच अनेक तमिळ चित्रपटात देखील झळकला. पण राणाला खरी ओळख करून दिली ती बाहुबली या चित्रपटानेच.

या दाक्षिणात्य सुपरस्टारचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपटाचा ट्रेलर  ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवसाच्या निमित्ताने  हैदराबादमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट २६ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळ चित्रपट दिग्दर्शक प्रभू सॉलोमन या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन करणार आहेत.

‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची कथा ही एका माणसाच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्याने आयुष्यातील बराच काळ जंगलात व्यतीत केला. त्याचे आयुष्य पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी गेले आहे. तीन मिनिटाच्या ट्रेलरमध्ये वन अतिक्रमण आणि क्रोनी कॅपिटॅलिझम यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्यात आल्याचे दिसून येते. ह्या चित्रपटाची कथा माणूस आणि हत्ती यांच्यातील मैत्रीची आहे. या चित्रपटात राणा हा वनदेवतेची भूमिका साकारत आहे. राणा सोबत अभिनेता पुलकित सम्राट, विष्णू विशाल, श्रीया पिळगावकर आणि झोया हुसेन यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हिंदीमध्ये ‘हाथी मेरे साथी’ तामिळमध्ये ‘कादान’ आणि तेलुगूमध्ये ‘अरन्या’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती इरॉस मोशन या पिक्चर्सने केली आहे. सन १९७१ मध्ये राजेश खन्ना यांचा हाथी मेरे साथी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्यांच्या या चित्रपटाला प्रचंड पसंती मिळाली होती.  आता राणाचा हा चित्रपट किती प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राणाने बॉलिवुडमध्ये देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. बिपाशा बासू आणि अक्षय कुमारसोबत देखील त्याने स्क्रीन शेयर केली आहे. सोबतच तो हाउसफुल ४, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटात देखील दिसला होता. दाक्षिणात्य चित्रपटात त्याने कमालीचे ऍक्शन सिन दिले आहेत.

कोरोना काळात तो आपल्या लग्नामुळे अधिक चर्चेत राहिला होता, त्यावेळी फक्त त्याच्या लग्नाला ३० लोक उपस्थित राहिले होते, ज्यात समंथा अक्कीनेनी, नागा चैतन्य, राम चरण आणि अल्लू अर्जुन यांचा समावेश होता.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा