×

Video | थालापती विजयने निवडणुकी दरम्यान दाखवले नम्र वर्तन, मात्र सर्वांसमोर मागावी लागली माफी; पण का?

दाक्षिणात्य अभिनेत्यांची लोकप्रियता कशी असते, हे काही सांगायला नको. या अभिनेत्यांचे चाहते इतके वेडे असतात की जाईल तिथे या अभिनेत्याभोवती गर्दी पाहायला मिळते. आता असाच काहीसा अनुभव अभिनेता थालापती विजयला  (Thalapathy Vijay) आला आहे. आपल्या चाहत्यांच्या गर्दीने शेवटी त्याला माफी मागण्यास भाग पडले. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.

थालापती विजय हा दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. विजयच्या चित्रपटांची, अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. त्याचा चाहतावर्गसुद्धा प्रचंड मोठा आहे. देशभर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नुकताच विजय मतदान करण्यासाठी गेला असता तिथे झालेल्या गर्दीमुळे त्याला लोकांची माफी मागावी लागली.

अभिनेता विजय स्थानिक निवडणुकांसाठी मतदान करायला मतदान केंद्रावर गेला होता. यावेळी त्याला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी प्रचंड गर्दी त्याठिकाणी जमली आणि या गर्दीमुळे तिथे असलेल्या इतर सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. हा सगळा प्रकार लक्षात येताच विजयने लोकांमध्ये येऊन हात जोडून माफी मागितली. या व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून विजयच्या या नम्रपणाचा, मोठ्या मनाचा सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. मोठेमोठे अभिनेते अशा गर्दीत फसले की ओरडतात, राग व्यक्त करतात मात्र विजयच्या या कृतीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. सध्या हा व्हिडिओ आणि विजयचे मतदान करतानाचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत. फोटोमधील त्याचे नम्र भाव सगळ्यांना खूप आवडले आहेत.

समोर आलेल्या बातमीनुसार, विजयचे अनेक चाहते या निवडणुकीत उभे राहिले आहेत. यावेळी या चाहत्यांनी विजयाच्या पक्षाचा झेंडा वापरून उभे राहण्याची परवानगी त्याच्याकडे मागितली आहे. अभिनेता विजयने विजय मक्कल इयक्कम नावाचा राजकीय पक्षसुद्धा काढला आहे. दरम्यान अभिनेता थलपती विजय लवकरच नेल्सन दिलीपकुमार यांच्या चित्रपटात काम करणार आहे. त्याचबरोबर त्याचे ‘अरेबिक कुथु’ हे गाणे सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post