Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा डायरेक्टरने खूप मनवलं, तरीही समंथा अडली; ‘पुष्पा 2’मध्ये ‘तसलं’ काम करण्यास थेट दिला नकार

डायरेक्टरने खूप मनवलं, तरीही समंथा अडली; ‘पुष्पा 2’मध्ये ‘तसलं’ काम करण्यास थेट दिला नकार

समंथा प्रभूने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटात ‘ऊ अंटवा’ या गाण्यावर तिने धमाकेदार डान्स केला. तिच्या या गाण्याने आणि सेक्सी लूकने बरीच चर्चा झाली. हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले. या चित्रपटाचे हे आयटम साँग प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण होते, ज्याने प्रेक्षकांचे खूप लक्ष वेधून घेतले. आता ती यापुढे असे आयटम सॉंग करणार नसल्याचा निर्णय तिने घेतला आहे. नक्की काय कारण आहे जाणून घ्या…

समंथाला (Samantha Ruth Prabhune) पुष्पा 2 (Pushpa 2) मध्ये आणखी एक आयटम सॉंग करण्यासाठी ऑफर देण्यात आली, परंतु आता तिला अशी गाणी करण्यात रस नाही. एका वृत्तानुसार, समंथाला पुष्पा दिग्दर्शक सुकुमारने सिक्वेलमध्ये आयटम सॉंग करण्याची ऑफर दिली होती. परंतु तिने ती स्वीकारण्यास नकार दिला. चित्रपटाच्या कथेला जोडण्यासाठी दिग्दर्शकाने तिला छोट्या भूमिकेची ऑफर देखील दिली होती, परंतु अभिनेत्री तिच्या करिअरच्या या टप्प्यावर कोणताही आयटम सॉंग करणार नाही असे परखडपणे सांगितले.

पुष्पा 2 चे निर्माते समंथाने आयटम सॉंगची ऑफर स्वीकारावी म्हणून प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे चित्रपटातील एका खास गाण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. समंथाने 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 5 कोटी रुपये घेतले होते. या गाण्यासाठी अल्लू अर्जुननेच समंथाला वैयक्तिकरित्या राजी केले. मात्र, आता तिला आयटम सॉंग करण्यात रस नाही आणि यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पुष्पाच्या आयटम सॉंगसाठी समंथाला खूप ट्रोल करण्यात आले होते आणि असेही म्हटले जाते की अशाच काही प्रोजेक्टमुळे तिचे लग्न मोडले होते. ‘फॅमिली मॅन’ या सिरीजमध्ये प्रथम सामंथाने बोल्ड सीन्स दिले आणि नंतर पुष्पाचा आयटम नंबर साइन केला! नागा चैतन्यने त्याच्या तिच्यावर अशा प्रकल्पांवर स्वाक्षरी करण्यास आक्षेप घेतला होता. पुष्पाच्या गाण्यात सामंथाने अल्लू अर्जुनसोबत खूप बोल्ड मूव्ह केले होते.

पुष्पाचा आयटम नंबर ब्लॉकबस्टर असल्याबद्दल एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती, ‘लोक माझ्यावर कसे प्रेम करतात हे मी सांगू शकत नाही. ‘ऊ अंटवा’ (O Antwa) संपूर्ण भारतात एवढा हिट होईल अशी मला अपेक्षा देखील नव्हती. केवळ तेलुगू प्रेक्षकच नाही तर देशभरातील लोक माझ्या इतर चित्रपटांना विसरले आहेत, पण आता मला ‘ऊ अंटवा’ साठी ओळखतात.’

समंथा सध्या मायोसिटिस या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे, परंतु तिने कामातून इतका मोठा ब्रेक घेतलेला नाही. तिने कधीही तिच्या चाहत्यांना निराशही केले नाही. आजारातून लवकर बरे होण्यासाठी ती स्वतःची योग्य काळजी घेत आहे

कामाबद्दल बोलायचे झाले तर, समंथाकडे शकुंतलम, कुशी आणि सिटाडेलसारखे प्रोजेक्ट तिच्याकडे आहेत. अभिनेत्रीचा शाकुंतलम हा चित्रपट 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. तिच्याबद्दल अशी बातमी आहे की, तीने अलीकडेच अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करून तामिळनाडूच्या पलानी मुरुगन मंदिराचे दर्शन घेतले. (south-actress-samantha-ruth-prabhu-reject-item-song-in-pushpa-2-allu-arjun)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
घरी परताच उपविजेत्या शिव ठाकरे याचे जंगी स्वागत, एकदा व्हिडिओ पाहाच
चित्रपट बघताच ठरवले त्यांनी ध्येय आणि बनले भारताचे पहिले चित्रपट निर्माते; वाचा दादासाहेब फाळकेंचा संघर्षमय प्रवास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा