Tuesday, June 25, 2024

मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी दुःखद निधन

सध्या दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधून एकामागोमाग एक वाईट बातम्या येत आहेत. आज २२ फेब्रुवारी रोजी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री, कॉमेडी स्टार आणि टीव्ही होस्ट असलेल्या सुबी सुरेशचे दुःखद निधन झाले आहे. त्या केवळ ४१ वर्षांच्या होत्या. मागील काही काळापासून सुबी लिव्हरच्या समस्येमुळे पीडित होत्या. त्याच कारणामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांना याच समस्येमुळे कोची येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मल्याळम सिनेसृष्टीमधे दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुबी या बहुतकरून मल्याळम सिनेसृष्टीमधे काम करायच्या. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले. सुबी यांना त्यांच्या कॉमिक टायमिंगमुळे एक वेगळी ओळख मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे मल्याळम सिनेसृष्टीला मोठा झटका बसला आहे.

सुबी सुरेश यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मिमिक्री आर्टिस्ट म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी ‘सिनेमाला’ हा हिट कॉमेडी शो दिला. यात त्यांची कॉमेडी आणि कॉमिक टायमिंग पाहून प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली. या शोनंतर त्यांना प्रत्येक घरात ओळख मिळाली. या शोमधून त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेनंतर त्यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये एन्ट्री केली. त्यांनी ‘हॅपी हसबँड’सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. सिनेमाला हिट झाल्यानंतर त्या टीव्हीसोबत जोडल्या होत्या. त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. लहान मुलांसाठी त्यांनी ‘कुट्टी पट्टलम’ हा शो केला. त्यानंतर त्यांनी ‘कुट्टी कालावरा’ हा कुकरी शो केला. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे सर्वानाच मोठा झटका बसला आहे.

सुबी सुरेश यांच्या आधी जुनियर एनटीआर त्यांच्या चुलत भावाचे अभिनेते तारक रत्न यांचे निधन झाले होते. तारक रत्न यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाले. सुबी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा