Thursday, July 18, 2024

साऊथचं ‘हे’ स्टार कपल लवकरच अडकणार विवाहबंधनात

दक्षिण भारतीय अभिनेत्री विमला रमण (Vimla Raman) आणि अभिनेता विनय राय (Vinay Rai) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच ते रेशीमगाठीत अडकू शकतात, असे वृत्त आहे. मात्र, या लग्नाबाबत दोघांच्याही कुटुंबीयांनी अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

चाहत्यांना आवडचे दोघांची जोडी!
जेव्हा हे जोडपे मालदीवमध्ये एकत्र सुट्टी घालवताना दिसले, तेव्हा त्यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येऊ लागल्या. दोघे अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट केले जातात. विशेष म्हणजे, ते सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो देखील पोस्ट करतात. दोघांची जोडी चाहत्यांनाही खूप आवडते. (south actress vimala raman and kollywood actor vinay rai are all set to get married soon)

मुलींमध्ये लोकप्रिय आहे विनय
विनय रायने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जीवा दिग्दर्शित ‘उन्नले उन्नले’ या चित्रपटाद्वारे केली होती. विनय त्याच्या देखण्या लुकमुळे मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. तसेच तो ‘जयम कोंडन’ आणि ‘आंद्रेद्रम पुन्नगाई’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. यानंतर विनयने २०१७ मध्ये ‘थुप्परीवलन’ चित्रपटात खलनायक म्हणून काम केले आणि ईथूनच तो खूप लोकप्रिय झाला. आता त्याचा आगामी चित्रपट ‘ओह माय डॉग’ आहे, ज्याची निर्मिती सुर्या करत आहे. यामध्ये अरुण विजय आणि त्यांचा मुलगा अर्णव मुख्य भूमिकेत असणार आहेत. याआधीही त्याने अभिनेता सुर्यासोबत काम केले आहे.

विमला रमनबद्दल सांगायचे झाले, तर ४० वर्षीय ऑस्ट्रेलियन वंशाच्या अभिनेत्रीने, के बालचंद्र निर्मित प्रकाश राज यांच्या १००व्या चित्रपट ‘पोई’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतरही तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले. ती शेवटची सुंदर सीच्या ‘इरुत्तू’ या चित्रपटात दिसली होती. आता ती मल्याळम आणि तमिळ भाषेत प्रदर्शित होणाऱ्या ‘ग्रॅंडमा’मध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा