Saturday, August 9, 2025
Home साऊथ सिनेमा तमन्ना भाटियाला वयाच्या 13व्या वर्षापासूनच मिळू लागलेल्या ऑफर्स, पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली अभिनेत्री

तमन्ना भाटियाला वयाच्या 13व्या वर्षापासूनच मिळू लागलेल्या ऑफर्स, पण बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली अभिनेत्री

तमन्ना भाटियाला (Tamannaah Bhatia) आज कोणत्याही परितयाची गरज नाही. साऊथ व्यतिरिक्त ती हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्येही दिसली आहे. अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. मात्र, या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. असे असूनही तिची गणना दक्षिणेतील बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तमन्नाचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले असले, तरी ती दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तमन्ना भाटिया एका चित्रपटासाठी तब्बल 2 कोटी रुपये घेते.

दुसरीकडे, जर तमन्नाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले, तर तिची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच 110 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीचा जन्म 1989 मध्ये मुंबईत झाला. वयाच्या12व्या वर्षी तमन्नाने शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. वयाच्या 15व्या वर्षी तमन्नाने तिचा पहिला चित्रपट केला, ज्याचे नाव ‘चांद सा रोशन चेहरा’ होते. मात्र तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

त्यानंतर अभिनेत्री दक्षिणेकडे वळली. 2005 मध्ये ती ‘श्री’ या चित्रपटात दिसली होती. मग काय, बघता बघता तमन्ना साऊथची मोठी स्टार झाली. 2013मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आणि ती अजय देवगणसोबत (Ajay Devgan) ‘हिम्मतवाला’मध्ये दिसली.2014मध्ये ती ‘हमशकल्स’मध्ये दिसली होती. मात्र ‘बाहुबली’मध्ये तमन्ना प्रेक्षकांना खूप आवडली होती.

गेल्या वर्षी तमन्ना भाटियाला चित्रपट मिळत नसल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तमन्नाला चित्रपटांपेक्षा आयटम नंबरच्या ऑफर्स जास्त येत होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, ती गेल्या दोन वर्षांत काही चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. यादरम्यान तिने ज्या चित्रपटांमध्ये विशेष गाण्यांवर डान्स केला. ज्यात कन्नड चित्रपट ‘जगुआर’, ‘केजीएफ चॅप्टर 1, महेश बाबूचा चित्रपट ‘सरिलेरू नीकीवारु’ यांचा समावेश होता

हेही वाचा –
चिची मामाने कॉमेडियला केलं माफ? गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील भांडण आता संपणार का!
‘मिल्क’ नावाने प्रसिद्ध असलेली तमन्ना बनली बॉक्सर, ‘हे’ चित्रपट ठरले सुपरफ्लॉप

हे देखील वाचा