Saturday, June 29, 2024

डेटिंगच्या अफवांमध्ये रश्मिका मंदान्ना विजय देवरकोंडाने केली एकत्र दिवाळी साजरी, कॅप्शनमुळे चर्चांना आला वेग

अनेक दिवसांपासून,दाक्षिणात्य अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.दिवाळीच्या मुहूर्तावर या अफवांना वेग आला आहे. डेटिंगच्या अफवांमध्ये रश्मिका आणि विजयने एकत्र दिवाळी साजरी केली.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. विजयने फटाके फोडतानाचे आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत, तर रश्मिकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री साडी नेसून पोज देत आहे. तर विजय पिवळ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पोस्टचे कॅप्शन सारखेच असून रश्मिकाच्या फोटोमध्ये विजयचे घर दिसत आहे

रश्मिका आणि विजयने दिवाळीचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले- Happy Diwali my loves. यासोबतच दोघांनी हार्ट इमोजी आणि स्टार पोस्ट केले. यानंतर चाहत्यांना दोघांना चिडवण्याची संधी मिळाली. एका चाहत्याने लिहिले की, “मी रश्मिकाच्या पोस्टमध्ये हे कॅप्शन पाहिले आहे.”

दुसर्‍या एका चाहत्याने कमेंट केली की, “रश्मिका आणि विजयने एकच लिहिले आहे, दिवाळीच्या शुभेच्छा लव्ह.’ एकाने लिहिले- ‘कोणाला वाटते की ती विजयच्या घरी आहेत.’ याशिवाय एका व्यक्तीने लिहिले – ‘मॅडम विजय सरांच्या घराची भिंत फोटोमध्ये आहे.’

रश्मिका अलीकडेच तिच्या डीपफेक व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. कोणीतरी AI च्या मदतीने तिच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या मुलीचा चेहरा एडिट केला होता. अशा परिस्थितीत रश्मिकासह अनेक स्टार्सनी तंत्रज्ञानाचे तोटे आणि सुरक्षिततेबद्दल सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘जलसा’मध्ये बिग बींनी केली पूजा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
‘बाजीगर’ चित्रपटाला 30वर्षे पूर्ण, किंग खानने शिकवली होती शिल्पा शेट्टीला ऍक्टिंग

हे देखील वाचा