साऊथ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विजय आणि सामंथा रुथ प्रभू यांचा चित्रपट ‘खुशी‘ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ‘खुशी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर झाल्यापासून चाहते त्याकडे डोळे लावून बसले आहेत. अशातचा आता या चित्रपटातील गाणं रिलीज झाल आहे.
विजय (Vijay Deverakonda) आणि समंथा (Samantha Ruth Prabhu) यांच्या जोडीला लोकांनी खूप पसंत दिली आहे. या चित्रपटाचे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘खुशी’ (Khushi) चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये एक संगीत कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये विजय आणि सामंथा यांनी जबरदस्त परफॉर्म केले. विजय आणि समांथाच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये विजय सामंथाला उचलून घेऊन नाचताना दिसत आहे. दोघांची केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकले आहे. डान्सचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्या दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट पाहत आहेत. व्हिडिओमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर विजयने पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि शर्ट घातला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
यावर कमेंट करताना एका युजरने लिहीले की, “मला तुझा ड्रेस खुप आवडला.” दुसऱ्याने लिहिले की, “मला तुझी प्लाझो खुप आवडली.” असे म्हणत विजयची खिल्ली उडवली आहे. विजय आणि सामंथाचा हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. (Vijay Deverakonda romances Samantha in the new song of ‘Khushi’)
अधिक वाचा-
–भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या 4 सुपरस्टार्सच्या सिनेमांमध्ये आघाडीवर कोण? ‘हा’ सिनेमा सपशेल फ्लॉप
–धक्कादायक! सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण; बेल्ट आणि बांबूच्या काठीने चोप दिल्यानंतर…