Thursday, February 22, 2024

चित्रपट पाहा संस्कृती आणि सभ्यताला जपत जा, म्हणत कांताराप्रेमिंनी रश्मिका मंदानावर साधला निशाना

अनेक चाहत्यांच्या मनावर सतत राज्य करणारी प्रेक्षकांची क्रश म्हणजेच रश्मिका मंदाना हिने साउथच नाही तर बॉलिवूडवरही भुरळ घातली आहे. अभिनेत्री नेहमी सोशल मीडिवर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आपल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री विनातळावरुन येत असताना काही रिपोर्टरने तिला ‘कांतारा’ चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारले होते, तेव्हा तिने असे काही अत्तरे दिली ज्यामुळे अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केलं जातंय.

साउथ सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ( Rashmika Mandana) हिने आपल्या करिअरची सुरुवात दिग्दर्शक आणि निर्माता रिषभ शेट्टी (Rishabh Shetty)  याच्या ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटामधून केली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री विनातळावरुन येत असताना काही पॅपराजींनी तिला ‘कांतारा’ चित्रपट पाहिलाय का? असा प्रश्न विचारला तेव्हा तिने उत्तर दिले की, “अजून तरी नाही पाहिला, पण इथून गेल्यानंतर लवकरच पाहाणार आहे.” असं म्हणते निघून जाते. प्रेक्षकांविषयी ‘कांतारा’ चित्रपट प्रेमींनी रश्मिकावर टीकास्त्र सोडले आहेत. तिच्यावर अनेक चाहत्यांनी निशाना साधत ट्रोल केले आहे.

कन्नडमध्ये तयार झालेला कांतारा चित्रपट पैन इंडिया स्तरावर प्रदर्शित झालेला चित्रपटाला लोकांनी डोक्यवर घेतले आहे. अनेक कलाकारांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्याच पाहिला असून अनेकांनी प्रतिक्रियादेखिल व्यक्त केल्या आहेत, आणि रश्मिकाने अजून हा चित्रपट पाहिला नाही? असे ऐकूण अनेकांनी तिच्यावर निशाना साधत “चित्रपट पाहा संस्कृती आणि सभ्यताला जपत जा” असा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

कांतारा चित्रपटाने जरभरात प्रसिद्धी मिळवली असून बॉक्सऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. आतापर्यत चित्रपट पाहिला नाही म्हणून रश्मिकाला चित्रपट प्रेमिंनी फुकटचे सल्ले देत, तिला आठवण करुन दिली की, तु स्वत: देखिल तिथूनच पुढे आली आहेस आणि आज जी काही बनली आहेस ती सगळी कन्नड चित्रपटांमुळे घडली आहेस. तिने पहिला चित्रपट रिषभ सेट्टीसोबतच केला होता त्यामुळे तिने हा चित्रपट पाहायला पाहिजे होता.

रश्मिका मंदाना पहिल्यांदाच ट्रोल होत नाही, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सतत ट्रोल होताना दिसत आहे. तिच्याविरोधात अनेकांनी नको ते आरोप करुन रश्मिकाला ट्रोल केले आहे. अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याच्यासोबत रिलेशनसोबत असल्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. त्याशिवाय तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांवर संताप व्यक्त केला होता. तिला अशाप्रकारच्या ट्रोलिंगमुळे खूप त्रास होत आहे. तिने करिअरला सुरुवात केल्यापासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सनी दोओलला पाहून थरथर कापायचे हायपाय ‘; म्हणत, प्रियंकाने चोपडाने भारत दौऱ्यामध्ये शेअर केला रंजक किस्सा
रागाच्या भारात अर्चनाने पकडला शिव ठाकरेचा गळा, बिग बॉसने घडवली चांगलीच अद्दल

हे देखील वाचा