बॉलिवूडच्या गाण्यांची देशाबाहेरही जादू कायम! हिंदी गाण्यावरील हॉलिवूड मॉडेलचा डान्स व्हायरल

hollywood chrissy teigen dances her heart out on indian song video goes viral


बॉलिवूडची गाणी ऐकताच भारतातीलच नव्हे, तर परदेशातील लोकांचे पायही थिरकल्या शिवाय राहू शकत नाहीत. या गाण्यांत अशी जादू आहे की, भाषा अनोळखी असली तरी प्रेक्षक त्यावर नाचू लागतात. यासंबंधित नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हॉलिवूड मॉडेल क्रिस्सी टेगन हिंदी गाण्यांवर जोरदार डान्स करताना दिसत आहे. क्रिस्सी टेगनने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

क्रिस्सी टेगनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी आणि पोस्टद्वारे हा व्हिडिओ चाहत्यांसमोर सादर केला आहे. ज्यात आपण सुखबीर, नेहा कक्कर आणि योयो हनी सिंगची गाणी ऐकू शकतो. याशिवाय वरुण धवन आणि परिणीती चोप्राच्या ‘डिशूम’ या चित्रपटाच्या ‘जानेमन आह’ गाण्यावरही तिने डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे.

क्रिस्सी टेगन त्या मोजक्या लोकांपैकी आहे, ज्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून फॉलो केले जाते. 35 वर्षीय क्रिस्सी टेगन बऱ्याच वर्षांपासून ट्रम्पच्या धोरणांवर कडक टीका करत आहेत. सन 2017 मध्ये तिने एका ट्विटद्वारे हे उघडपणे सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला ब्लॉक केले होते. नंतर स्वत: क्रिस्सी टेगनने बायडेनला फॉलो करण्याची विनंती केली.

क्रिस्सीने 2010 मध्ये मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात केली आणि अल्पावधीतच तिने मोठे स्थान मिळविले. क्रिस्सी टेगन मूलत: फूड शोमध्ये हजेरी लावते आणि स्वत: ला फूडी म्हणते. तिने आत्तापर्यंत बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांना होस्ट केले आहे. तसेच, तिने पाककलेविषयी दोन पुस्तकेही लिहिली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नागीण’ फेम निया शर्माच्या बोल्ड अदांनी घातली काळजात घाव!! चाहत्यांकडून फोटो आणि व्हिडिओला मिळतोय खूपच वाव

-महिला दिनाचे औचित्य साधून सनी लिओनीने केला व्हिडिओ शेयर, म्हणाली ‘माझा नेहमी तिरस्कार…’

-जान्हवीच्या मॅनेजरने केला चाहत्यासोबत गैरव्यवहार; पाहून जान्हवीने केले असे काही, व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.