दिशा पटानीचा किक मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘टायगर श्रॉफच्या संगतीचा परिणाम’

see this video of disha patani why fans are saying female tiger shroff


दिशा पटानी बॉलिवूडची सर्वात स्टायलिश, हॉट आणि फिट अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि बर्‍याचदा तिचे व्हिडिओ व फोटो शेअर करते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तही दिशाने तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये दिशा किक मारताना दिसत आहे.

दिशाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती पायाने जोरदार किक मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या वर्कआऊट सत्रादरम्यानचा आहे. व्हिडिओ शेअर करत दिशाने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

तिने पोस्ट शेअर करत लिहले, “हॅपी वुमन्स डे, मला मजबूत करण्यासाठी धन्यवाद.” दिशाने व्हिडिओवर सेलिब्रिटी अ‍ॅक्शन ट्रेनर राकेश यादव यांना टॅग केले आहे.

दिशाच्या या व्हिडिओला आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर बर्‍याच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. टायगरच्या संगतीचा हा परिणाम असल्याचे, एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले आहे. त्याचवेळी एका दुसर्‍या वापरकर्त्याने दिशा पटानीला ‘फिमेल टायगर श्रॉफ’ म्हणून संबोधले आहे.

दिशा आणि टायगर दोघेही बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री आणि अभिनेते आहेत. त्यांच्या अफेअरच्या चर्चेलाही खूप उधाण येत असते. मात्र, तरीही त्या दोघांनीही याबद्दल खुलेपणाने काही सांगितले नाही. नुकतीच दिशा पटानी टायगर श्रॉफच्या वाढदिवशी स्पॉट झाली होती. यावेळी टायगर आणि त्याच्या कुटुंबीयांसह डिनरसाठी ती त्याच्या घरी पोहोचली होती. या दोघांचे हे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

दिशाने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला बऱ्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. आता ती अभिनेता सलमान खान सोबत ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या गाण्यांची देशाबाहेरही जादू कायम! हिंदी गाण्यावरील हॉलिवूड मॉडेलचा डान्स व्हायरल

-बोल्ड अभिनेत्री निया शर्मा घालतेय मैत्रिणीसोबत राडा!! भर रस्त्यावर शूट केलेल्या व्हिडिओला मिळतोय तुफान प्रतिसाद

-‘नागीण’ फेम निया शर्माच्या बोल्ड अदांनी घातली काळजात घाव!! चाहत्यांकडून फोटो आणि व्हिडिओला मिळतोय खूपच वाव


Leave A Reply

Your email address will not be published.