Tuesday, July 9, 2024

#RipJosephVijay? अभिनेता जिवंत असूनही का ट्रेंड होतंय त्याच्या मृत्यूचं हॅशटॅग?

प्रसिद्ध दाक्षिणात्य स्टार जोसेफ विजय चंद्रशेखर, ज्याला त्याचे चाहते थालापती विजय (Thalapathy Vijay) म्हणून ओळखतात. ४७ वर्षीय अभिनेता जोसेफ विजयने दक्षिण चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत आणि त्याचे चाहते खूप मोठे आहेत. लवकरच या अभिनेत्याचा ‘बीस्ट’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. पण अचानक त्याच्या मृत्यूची बातमी ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि युजर्स एकामागून एक ट्विट करत आहेत. त्याच्या मृत्यूचे फोटोही शेअर करत आहेत. अभिनेता जिवंत असूनही ट्विटरवर (RIP JosephVijay) का ट्रेंड करत आहे हे जाणून घेऊया.

साऊथ चित्रपटसृष्टीत चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या सुपरस्टारची जबरदस्त क्रेझ आहे. सुपरस्टारचा चित्रपट प्रदर्शित झाला की चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशा परिस्थितीत या स्टार्सच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर एकमेकांशी शाब्दिक युद्धही सुरू केल्याचे अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळेच अचानक सुपरस्टार जोसेफ विजय याच्या निधनाची बातमी ट्विटरवर ट्रेंड करू लागली. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. (south superstar joseph vijay death rumor trending on twitter know what is the truth)

‘आरआरआर’शी संबंधित आहे प्रकरण
खरं तर नुकताच अभिनेता रामचरण (Ramcharan) आणि ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांचा चित्रपट ‘आरआरआर’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. लवकरच सुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखरचा चित्रपट ‘बीस्ट’ देखील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर त्याचे द्वेष करणारे आणि चाहते यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. बरेच युजर्स #RipJosephVijay हॅशटॅगसह ट्विट करत आहेत. सोशल मीडियावर जोसेफ विजयच्या मृत्यूचे विचित्र फोटो मीम्सप्रमाणे शेअर केले जात आहेत.

चित्रपट ‘बीस्ट’
अभिनेता जोसेफचा आगामी चित्रपट ‘बीस्ट’ हा एक कॉमेडी ऍक्शन चित्रपट आहे. जो नेल्सन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि सिन पिक्चर्स निर्मित आहे. या चित्रपटात जोसेफ विजयसोबत अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. तमिळसोबतच हा चित्रपट कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा