दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्या (Suriya Sivakumar) सध्या त्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे आणि त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही करत आहे. अलीकडेच त्याने कोची येथे ‘इथरक्कुम थुनिंदावन’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान सुर्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले, ज्याला त्याने अतिशय बिनधास्तपणे उत्तर दिले.
‘बॉलिवूडमध्ये काम करण्याची गरज नाही’
बॉलिवूडमध्ये काम करायला आवडेल का, असे विचारले असता सुर्या म्हणाला, “जे काम मी आणि दक्षिण भारतीय कलाकार इथे करत आहोत, बॉलिवूडने आमच्याबद्दल बोलण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडणार. अर्थात ही खूप मोठी इंडस्ट्री आणि एक मोठे व्यासपीठ आहे. जर संधी मिळाली तर मी नक्कीच बॉलिवूडमध्ये काम करेन, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिथे जाण्याची गरज वाटत नाही.” (south superstar suriya talked about working in bollywood industry in a press meet)
महिलांना केलं संबोधित
सूर्याने जगातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की, या लोकांचे प्रेम आणि त्यागामुळेच आपले जग सुंदर झाले आहे. महिलांकडून आपल्याला खूप काही शिकण्याची गरज आहे.” सूर्या पुढे सांगतो की, “आमच्या घरी कोणी पाहुणे आले तर आम्ही आमच्या मुलींना त्यांची काळजी घेण्यास सांगतो, मुलांना नाही. असे का? या बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून आणि आपल्या घरापासून करायला हवी.”
मल्याळम चित्रपटांमध्ये करायचंय काम
मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल सुर्या म्हणाला, “मी येथेही भाषेचा अडथळा दूर करू शकत नाही, परंतु मला मल्याळम इंडस्ट्रीत किमान एक चित्रपट करायला आवडेल.” मल्याळम चित्रपट ‘भीष्मपर्वम’ प्रदर्शित होण्याची वाट पाहत असल्याचे त्याने सांगितले.
आगाची चित्रपटाची कहाणी
त्याच्या आगामी चित्रपट ‘अथरक्कुम थुनिंधव’बद्दल बोलताना अभिनेता म्हणाला की, त्याची कथा अशी आहे जी कोणत्याही कुटुंबात घडू शकते. कोणत्याही कुटुंबात घडू शकतो, अशा विषयावर हा चित्रपट आधारित आहे, असेही यावेळी त्याने सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा