Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

पद्म पुरस्कार २०२१ : एसपी बालासुब्रमण्यम, केएस चित्रा यांसह खालील कलाकारांचा होणार पद्म पुरस्कारांनी सन्मान

आज आपला देश ७२ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाकडून पद्मा पुरस्करांची घोषणा करण्यात येते.

पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्कार आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यांत या पुरस्कारांचा प्रदान समारंभ होतो .भारत-सरकारने १९५४ मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण अशा दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांची सुरुवात केली.

ह्यावर्षी देखील या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ७ श्रेष्ठींना पद्म विभूषण, १० श्रेष्ठींना पद्मा भूषण, आणि १०२ श्रेष्ठींना पदमश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. या यादीत मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध, लोकप्रिय गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बालासुब्रमण्यम यांचे सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि पद्म भूषण या दोन्ही पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

sp
sp

या शिवाय त्यांना सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवले आहेत. बालासुब्रमण्यम यांनी त्यांच्या संपूर्ण करियरमध्ये १६ भाषांमध्ये ४०,००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत.

या पुरास्कारांमधील दुसरे नाव आहे सुप्रसिद्ध आणि सुमधुर गायिका केएस चित्रा. केरळच्या असणाऱ्या केएस चित्रा यांना देखील पद्म विभूषण पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.

चित्रा ह्या भारतीय शास्त्रीय संगीतासोबतच भक्तीगीत आणि लोकप्रिय संगीत गाण्यात कुशल आहेत. त्यांनी तेलुगु, मल्याळम, तमिल, कन्नड़, हिंदी, बंगाली, उड़िया, पंजाबी, गुजराती, राजस्थानी, उर्दू, संस्कृत, आणि बांगला आदी भाषांमध्ये २५,००० पेक्षा अधिक गाणी गेली आहेत.

यासोबतच दक्षिण भारताचे सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, अभिनेता, गायक, पटकथा लेखक कैथाप्रम यांना पद्म श्री सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गीतं गुंफली आहेत.सोबत त्यांनी काही सिनेमांमध्ये अभिनय देखील केला आहे.

k-s-chithra
k-s-chithra

या सर्वोच्च पुरस्कारांमधील अधिक नावे पुढील प्रमाणे.

पद्मविभूषणः

जापानचे माजी प्रधान मंत्री शिंजो आंबे, सॅण्ड (रेतीचा वापर करून चित्र रेखाटणारे) कलाकार सुदर्शन साहू, पुरातत्वविद बीबी लाल, मौलाना वहिदुद्दिन खान, विज्ञान आणि प्रौद्योगिकी श्री नरिंदर सिंह कपानी यांना मरणोपरांत, डॉ बेले मोनप्पा हेगड़े आदी लोकांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेत.

पद्मभूषणः

माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, पीएम यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना मरणोपरांत, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना मरणोपरांत आणि लखनऊचे धर्मगुरु कल्बे सादिक यांना मरणोपरांत,  केशुभाई पटेल (मरणोपरांत), रजनीकांत श्रॉफ, तारलोचन सिंह, चंद्रशेखर कांबरा, कृष्णन नायर शांतकुमारी

हे देखील वाचा