अशाप्रकारे आलिया, कॅटरिना आणि प्रियांका झाल्या ‘जी ले जरा’ चित्रपटासाठी तयार, जोया अख्तरने केला खुलासा


फरहान अख्तरने या वर्षी ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा करून सगळ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील तीन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र हा चित्रपट करणार आहेत. त्यामुळे चित्रपटात काहीतरी खास असणार आहे, यात काही शंकाच नाही. या चित्रपटात आलिया भट्ट, कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा असणार आहे. या तीन अभिनेत्रींना एकत्र एका चित्रपटात पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाद्वारे फरहान अख्तर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट खास तीन महिलांनी केलेली रोड ट्रीपवर आधारित आहे.

अशातच जोया अख्तरने खुलासा केला आहे की, तिने आलिया, कॅटरिना आणि प्रियांका या तिघींना एकत्र चित्रपटात काम करण्यासाठी तयार केले आहे. तिने सांगितले की, तिने स्वतः अभिनेत्रींना कॉल केला होता आणि सांगितले होते की, तिला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. तिने सांगितले की, त्या तिघींना काहीच कल्पना नव्हती की, या प्रोजेक्टवर फरहान देखील एका बाजूने काम करत आहे. ती म्हणाली की, “फरहानकडे आधीपासूनच काही अशा कल्पना होत्या. त्याने सांगितले की, मला हा चित्रपट मुलींसोबत करायचा आहे.” (zoya akhtar reveals how alia bhatt, katrina kaif and priyanka chopra agree to do jee le zara)

जोयाने पुढे सांगितले की, “मला आलिया आणि कॅटरिना यांचा वेग-वेगळा कॉल आला की, त्या एकत्र काम करण्यास तयार आहेत. तसेच प्रियांकाने देखील कॉल करून सांगितले की, ती देखील काम करणार आहे. या खास गोष्टीची फरहानला अजिबात कल्पना नव्हती. हे खूप सहजरित्या शक्य झाले कारण सगळ्यांना एकत्र काम करण्याची इच्छा होती.” ‘जी ले जरा’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. तिने तिन्ही अभिनेत्रींचे खूप कौतुक केले.

तिने पुढे सांगितले की, “या चित्रपट होण्यामागील एक कारण म्हणजे चित्रपटात असणाऱ्या सगळ्यांना हा चित्रपट करायचा होता. १० वर्षांपूर्वी जरी या अभिनेत्रींनी आणि दिग्दर्शकाने ठरवलं असतं, तरी देखील हा चित्रपट होऊ शकला असता. कारण या तिन्ही अभिनेत्री खूप शानदार आहेत. तिघींसारख्या कोणीही नाहीये.”

या चित्रपटातील तीन अभिनेत्रींबाबत बोलायचे झाल्यास, त्या तिघीनींही मोठ्या पडद्यावर काम केले आहे. आलिया आणि कॅटरिना खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांनी एका चॅट शोमध्ये त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत हे सांगितले होते. कॅटरिना आणि प्रियांका यांनी अनेक पार्टीमध्ये हजेरी लावली होती.

हेही वाचा :

काय सांगता! राजेश खन्ना अन् मुमताज यांच्या ‘या’ सिनेमातील क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी लागले होते आठ दिवस

‘बिग बॉस’पासून ‘खतरों के खिलाडी’पर्यंत ‘हे’ आहेत २०२१ मधील रियॅलिटी शोचे विजेते, जाणून घ्या संपूर्ण यादी

रश्मी देसाई आणि अभिजीत बिचुकले झाले ‘तिकीट टू फिनाले’मधून बाहेर, घरातील सदस्यांनी दिला निर्णय 

 

 

 


Latest Post

error: Content is protected !!