Saturday, February 22, 2025
Home मराठी छोट्या इशानच्या कवितांनी स्पृहा जोशीची केली बोलती बंद, गंमत जंमतचा नवा एपिसोड आला प्रेक्षकांच्या भेटीला

छोट्या इशानच्या कवितांनी स्पृहा जोशीची केली बोलती बंद, गंमत जंमतचा नवा एपिसोड आला प्रेक्षकांच्या भेटीला

स्पृहा जोशी (Spruha Joshi ) ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  अनेक गाजलेले चित्रपट आणि मालिकांमध्ये स्पृहाने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवरुन ती नेहमीच नवनवे व्हिडिओ शेअर करत असते. तिचा असाच एक नवीन व्हिडिओ सध्या समोर आला असून ज्यामध्ये गंमत जंमत या विशेष भागात तिने छोट्या मुलासोबत गप्पा मारलेल्या पाहायला मिळत आहेत. 

स्पृहा जोशी आपल्या अभिनयासाठी तर लोकप्रिय आहेच, त्याचबरोबर ती तिच्या सुंदर कवितांसाठीही प्रसिद्ध आहे. आपल्या अनेक सुंदर कविता ती आपल्या युट्यूब चॅनेलवरुन प्रेक्षकांसमोर घेऊन येत असते. पण तिच्या या नवीन गंमत जंमत च्या विशेष भागात स्पृहा जोशीसोबत सहभागी झालेल्या इशान चौगुले या लहान मुलानेच सुंदर कविता सादर करत सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या कवितेसोबतच इशानच्या बाललिला, त्याला पडलेली स्वप्न, शाळेतील गमती जमती अशा अनेक विषयांवर त्याने त्याच्या बोबड्या बोलात सांगितलेल्या गोष्टी खूपच मनोरंजक आहेत.

या व्हिडिओमध्ये इशानने विं. दा. करंदीकर यांची स्वप्नात पाहिली रानीची बाग ही कविता अप्रतिमरित्या सादर केली आहे. इशानच्या या कवितेने स्पृहा जोशीही थक्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. इशानने ऐकवलेल्या कवितेनंतर स्पृहा जोशीनेही त्याच्यासाठी तिच्या सुंदर आवाजात कवी भानुदास यांची पडू आजारी, मौज हीच वाटे भारी ही कविता वाचून दाखवली.स्पृहाच्या या व्हिडिओमध्ये इशानची निरागसता, स्पृहाने मारलेल्या गप्पा आणि तिच्या प्रश्नांना छोट्या इशानने दिलेली मजेशीर उत्तरे यांमुळे त्यांची गप्पांची मैफिल खूपच रंजक होताना दिसत आहे. स्पृहाचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा