Friday, February 3, 2023

Spruha Joshi | ‘अनुनाद’ आणि ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ पुस्तकांबद्दल स्पृहाचा विशेष Video, सांगितल्या खास गोष्टी

स्पृहा जोशी सध्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या यूट्यूब व्हिडिओमुळे देखील तुफान गाजत आहे. स्पृहा जोशी म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील एक मोठी आणि प्रतिभावान अभिनेत्री तिने तिच्या अभिनयासोबतच, सूत्रसंचालन, कविता लेखन, वाचन अशा विविध भूमिकांमधून तिच्यातील हुशार व्यक्तिमत्वाची प्रेक्षकांनावर छाप पडली आहे. स्पृहा नेहमीच पठडीबाहेर जाऊन विचार करते आणि कामही करते.

तिच्या स्पृहा जोशी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून स्पृहाने एक वेगळे आणि सुंदर काम हातात घेतले आहे. या चॅनेलमार्फत ती तिच्या चाहत्यांच्या फर्माईशी तर पूर्ण करतेच सोबतच वेगवेगळ्या कवितांचे वाचन, विविध खास दिवसांचे हटके पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसते. काही दिवसांपूर्वी स्पृहाने जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने पोस्ट केलेल्या व्हिडिओला अमाप प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा अति एक नवीन विडिओ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्पृहाने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तिने ‘My Book Shelf’ नावाच्या एका सेगमेंटमध्ये तिने वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती दिली आहे.

या व्हिडिओमध्ये स्पृहाने सांगितले की, तिने स्वतःला महिन्यातून एक पुस्तक वाचनाची खूप चांगली सवय लावली असल्याने खूपच चांगल्या चांगल्या नवनवीन पुस्तकांचे वाचन तिला यानिमित्ताने करायला मिळते. नुकतेच तिने दोन पुस्तक वाचले असून, या दोन्ही पुस्तकांबद्दल तिने या व्हिडिओमध्ये भरभरून सांगितले आहे. अनिरुद्ध भाटे या तिच्या मित्राने तिला महिन्यातून एकदा एक पुस्तक वाचण्याचा संकल्प त्यानेच तिला सुचवला. अनिरुद्धनेच स्पृहाला ही दोन पुस्तकं भेट म्हणूनही दिली. तिने वाचलेल्या पहिल्या पुस्तकांचे नाव आहे नेहा लिमये यांचे ‘अनुनाद’. या पुस्तकातील शेवटचे पान तिने व्हिडिओमध्ये वाचून दाखवले आहे. स्पृहाने वाचून दाखवलेल्या एका परिच्छेदावरून लक्षात येते की, हे पुस्तक गाण्याशी, गाण्यातील रागांशी संबंधित आहे.

पुढचे स्पृहाने वाचलेले दुसरे पुस्तक म्हणजे ‘मध्यरात्रीनंतर चे तास’ हे ‘सलमा’ या तामिळ लेखिकेचे पुस्तक असून त्याचा मराठी अनुवाद सोनाली नवांगुळने केला आहे. यंदाचा उत्कृष्ट अनुवादसाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे. स्पृहाला हे पुस्तक खूपच आवडले. या पुस्तकातील मूळ लेखिका, अनुवाद केलेली लेखिका किंवा पुस्कातील माहिती आदी सर्वच खूप आवडले. या पुस्तकाचे देखील शेवटचे पान तिने वाचून दाखवले. हे पुस्तक सलमा यांच्या आयुष्याशी संबंधित असून, त्यांनी या रूढीवादी समाजच्या पलीकडे जाऊन केलेले मोठे कार्य यातून वाचन प्रेमींना वाचता येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा