उत्पल दत्त यांचे खळखळून हसायला लावणारे ‘हे’ पाच विनोदी चित्रपट म्हणजे हास्यरसिकांसाठी पर्वणीच

हिंदी चित्रपट जगतात अशी अनेक व्यक्तिमत्वे होऊन गेली ज्यांनी अभिनय, नाटके, लेखन सगळ्याच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. या सगळ्यात उत्पल दत्त यांच्या तुफान कॉमेडी चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते. उत्पल दत्त यांनी आपल्या कारकिर्दित अनेक विनोदी चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या या चित्रपटांनी चाहत्यांना पोटभरुन हसायला लावले. उत्पल दत्त (utpal dutt) यांचा जन्म २९ मार्च १९२९ मध्ये झाला. खलनायकाची असो किंवा विनोदी भूमिका असो त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज (२९ मार्च) उत्पल्ल दत्त यांची जयंती, पाहूया त्यांचे काही तुफान गाजलेले हे पाच चित्रपट. 

गोलमाल :

1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलमाल चित्रपटातील उत्पल दत्त यांच्या भूमिकेची सगळीकडे चर्चा रंगली होती. ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात उत्पल्ल यांनी या चित्रपटात भवानी शंकर नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटसाठी त्यांना उत्कृष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

नरम गरम:

ऋषिकेश मुखर्जी यांचा हा चित्रपट १९८१ मध्ये आला होता. या चित्रपटात उत्पल दत्त यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती.आपल्या खास विनोदी शैलीत त्यांनी सगळ्यांनाच खळखळून हसायला लावले होते. या चित्रपटासाठीही त्यांना सर्वश्रेष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

शौकीन : 

‘शौकीन’ चित्रपट १९८२ ला प्रदर्शित झाला होता. १९८२ ला प्रदर्शित झालेल्या बासु चॅटर्जी यांचा हा चित्रपट सर्वोत्कृष्ठ चित्रपट अभिनेता म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची कथा तीन मित्रांच्या अवतीभोवती फिरत असते, जे एका प्रवासाला जातात आणि रती अग्निहोत्री यांच्या प्रेमात पडतात. या चित्रपटात उत्पल दत्त यांनी एका मध्यमवयीन युवकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कंजूष व्यक्तिची भूमिका साकारली आहे.

किसी से ना केहना –

या चित्रपटात उत्पल दत्त यांनी साकारलेली भूमिका प्रत्येकाला आवडेल अशीच होती. या चित्रपटात त्यांनी एक अशी व्यक्तीरेखा साकारली होती ज्यांचा असा समज होता की शिक्षणाने मुलांचे भविष्य खराब झाले आहे. त्यामुळे ते आपल्या मुलासाठी अशिक्षित बायको शोधायला लागतात. मात्र त्यांचा मुलगा एका डॉक्टर मुलीच्या प्रेमात पडतो.

अंगुर –

१९८२ मध्ये आलेल्या ‘अंगुर’  या चित्रपटात संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. आणि त्यांच्या पित्याची भूमिका उत्पल्ल दत्त यांनी साकारली होती. हा चित्रपट विलियम शेक्सपिअर यांच्या ‘ए कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावर आधारित होता. ज्यामध्ये दोन जुळ्या मुलांची कथा रंगवली आहे, जे लहान वयात एकमेकांपासून दुर जातात. नंतर ते तब्बल चार वर्षांनी भेटतात. या चित्रपटातील उत्पल्ल दत्त यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा