Sunday, February 23, 2025
Home मराठी Spruha Joshi | चाहत्यांची फर्माईश पूर्ण, अभिनेत्रीने सादर केली कुसुमाग्रजांची नाट्यमय, थरारक कविता

Spruha Joshi | चाहत्यांची फर्माईश पूर्ण, अभिनेत्रीने सादर केली कुसुमाग्रजांची नाट्यमय, थरारक कविता

अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. तसेच अनेकवेळा ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केल्या पासून स्पृहा युट्यूबवरही बरीच सक्रिय राहायला लागली आहे. या ठिकाणी ती चाहत्यांचे मनोरंजन तर करतेच, सोबतच त्यांना अनेक गोष्टींसाठी प्रोत्साहित करते, जागरूक करते. ती तिच्या चॅनेलवर कविता वाचन, आवडलेल्या पुस्तकाबद्दल माहिती आदी अनेक गोष्टी करते. स्पृहाच्या या सर्व व्हिडिओंना चांगलाच प्रतिसाद देखील मिळतो.

अशातच आता स्पृहाने चाहत्यांची फर्माईश पुर्ण करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सांगते की, चाहत्यांनी फर्माईश केलेली ही कविता तिची ही आवडती कविता आहे. तिने यात कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ‘अहि- नकुल’ ही लोकप्रिय कविता चाहत्यांसमोर सादर केली आहे. या कवितेबद्दल बोलताना स्पृहा सांगते की, ही कविता एक नाट्यमय कविता आहे. एक थरारक असा प्रसंग कुसुमाग्रज यांनी आपल्या श्रीमंत भाषेतून आपल्या सर्वांसमोर सादर केला आहे.

कविता सादर केल्यानंतर स्पृहा कुसुमाग्रजांबद्दल दोन शब्द बोलते. ती म्हणते की, “कुसुमाग्रजांची प्रतिभाच इतकी अफाट आहे की, त्यांनी एका मुंगूसाचं आणि नागाचं चाललेलं युद्धाचा पट आपल्या डोळ्यांसमोर ऊभा केलाय. अशी कविता सादर करताना ती देखील नाट्यमय पद्धतीनेच सादर करावी लागते.” या कवितेवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून स्पृहाच्या सादरीकरणाला चांगलीच दाद मिळत आहे.

तिने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. तिने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे. अभिनयासोबत स्पृहा एक उत्तम सूत्रसंचालिका देखील आहे. तिने ‘सूर नाव ध्यास नवा’ या गायनाच्या शोचे सूत्रसंचालन केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा