Sunday, February 23, 2025
Home मराठी तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला | स्पृहा जोशीची नवीन कविता श्रोत्यांच्या भेटीला

तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला | स्पृहा जोशीची नवीन कविता श्रोत्यांच्या भेटीला

अनेक मालिका आणि चित्रपटात आपल्या मधाळ आवाजाने आणि उत्कृष्ट अभिनयाने सगळ्यांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी. अभिनयासोबत सूत्रसंचालन करून देखील तिने तिची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिच्यात असणाऱ्या कला गुणांची माहिती सगळ्यांना झाली आहे. स्पृहा ही खूप सुंदर सादरीकरण करते. अनेक कार्यक्रमामधून तिने तिचे कौशल्य दाखवले आहे. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ती सक्रिय असते.

अभिनेत्रीची आणखी एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. ती म्हणजे स्पृहा (Spruha joshi) ही यूट्यूबवरून तिच्या कविता, आवडली पुस्तके याबाबत माहिती शेअर करत असते. तसेच इतरांच्या कविता देखील तिच्या लयबद्ध भाषेत ऐकवत असते. तिच्या या यूट्यूब चॅनलला आणि तिच्या कवितांना चाहते देखील भरभरून प्रतिसाद देत असतात. अशातच तिने फर्माईशच्या खास भागात तिने एक सुंदर कविता तिने म्हटली आहे. (Spruha joshi’s new poem release on her You tube channel)

या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, ही कविता तिच्यासाठी खूप खास आहे. कारण कविता तिला खूप आवडते. तिच्या कवितेचे नाव हे ‘तुकाबाच्या भेटी शेक्सपियर आला’ असे आहे. ही कविता कवी विं. दा. करंदीकर यांनी लिहिली आहे.

कवितेत ती म्हणते की, “तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला, तो सोहळा झाला दुकानात,
जाहली दोघांची उराउरी भेट, उरतले थेट ऊरामध्ये.
तुला म्हणे विल्या तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला.
शेक्सपियर म्हणे एक ते राहिले. तुवा जे पाहिले विटेवरी,
तुला म्हणे बाबा तू त्वां बरे केले. त्याने तडे गेले संसाराला.
विठ्ठल अट्टल, त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहूनिया.”

अशाप्रकारे अत्यंत सुंदर कविता तिने चाहत्यांसाठी सादर केली आहे. तिच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने श्रोते देखील दंग झाले आहेत. अनेकजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा