Saturday, April 20, 2024

‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर नम्रता मल्लाचा जबरदस्त बेली डान्स, मूव्ह्ज पाहून हरपेल भान

भोजपुरी स्टार नम्रता मल्ला (Namrata Malla) मीडियावर खूप सक्रिय असते. नम्रता अनेकदा तिच्या डान्समधून फोटो शेअर करून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. नम्रताचे चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओंवर सतत लाईक आणि कमेंट करत असतात. तिने पुन्हा एकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. भोजपुरी सेन्सेशन नम्रता मल्ला थांबण्याचे नाव घेत नाही.

खेसारी लाल यादवसोबतच्या ‘दो घुंट’ गाण्यात दहशत निर्माण केल्यानंतर नम्रता मल्ला थांबण्याचे नाव घेत नाहीये. ती रोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे होश उडवत असते. अभिनयासोबतच नम्रता अप्रतिम बेली डान्स देखील करते, ज्याची एक झलक ती तिच्या डान्स व्हिडिओमध्ये दाखवली आहे.

माधुरीच्या गाण्यावर नम्रताचा डान्स
भोजपुरी सिनेमात आपली जादू चालवल्यानंतर नम्रताला आता बॉलिवूडमध्ये जायचे आहे. यासाठी ती सध्या बॉलिवूडच्या डान्सची प्रॅक्टिसही करत आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) गाण्यांवर डान्स केल्यानंतर, नम्रता मल्लाने एक नवीन डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या डान्स व्हिडिओमध्ये ती माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या ‘चोली के पीचे क्या है’ या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे.

माधुरी दीक्षितने ‘चोली के पीछे है’ वर डान्ससोबतच जबरदस्त एक्सप्रेशन्स दिले. तर दुसरीकडे नम्रताने बेली डान्स करून बॉलिवूडच्या सुपरहिट गाण्यावर थिरकली आहे. म्हणजेच अप्रतिम डान्स केला आहे. नम्रताचा हा डान्स माधुरीने पाहिला तर मिथुन दादाच्या स्टाईलमध्ये ‘क्या बात, क्या बात, क्या बात’ म्हणताना दिसणार आहे.

डान्स आहे जीवन
काही लोकांसाठी डान्स ही केवळ एक कला नसून जीवनाचा एक भाग आहे. नम्रतासाठी डान्स तिच्या आयुष्यापेक्षा कमी नाही. याचा उल्लेख तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेकदा केला आहे. आता पुन्हा तिने डान्सची आवड व्यक्त केली आहे. व्हिडिओ शेअर करत नम्रता कॅप्शनमध्ये लिहिले की, “ते याला डान्स म्हणतात. मी याल जीवन म्हणते.” यासोबतच तिने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीही बनवले आहे. नम्रता मल्लाचे डान्ससाठी असलेले हे प्रेमच ती या क्षेत्रात अनेक नवीन गोष्टी करणार असल्याचे सांगत आहे.

नम्रताचा पारंपारिक व्यतिरिक्त बिकिनी लूक देखील नेहमीच चर्चेत असतो. नम्रता सतत बिकिनीमधील सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ज्यासाठी चाहते वेडे झाले आहेत. जर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गेलात तर तुम्हाला न आवडणारा कोणताही बिकिनी लूक दिसणार नाही.

नम्रता उत्तम बेली डान्सर असून, तिच्या शानदार डान्समुळे ती अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. नम्रता मल्ला भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या ‘दो घुंट’ या गाण्यावर थिरकली आहे. सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणाऱ्या नम्रताने ‘दो घुंट’ या गाण्यात अप्रतिम मूव्ह्ज दाखवल्या आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा