Wednesday, July 3, 2024

महिला दिनाच्या निमित्ताने सुहाना खानची गर्ल गँगसोबत धमाल, बिकिनी लूकमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार

बॉलिवूडमध्ये नेहमीच कलाकारांसोबत त्यांच्या मुलांची देखील जोरदार चर्चा असते. या इंडस्ट्रीमधील काही स्टार किड्स तर कलाकारांपेक्षा जास्त लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार कीड म्हणजे सुहाना खान (Suhana Khan). बॉलिवूडच्या बादशहाची शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी असलेल्या सुहाना खानला तुफान फॅन फॉलोविंग आहे. अजून तिने या क्षेत्रात एन्ट्री घेतली नसली तरी तिची लोकप्रियता एखाद्या बड्या अभिनेत्रीसारखीच आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सुहानाच्या पोस्ट तिला नेहमीच मीडियामध्ये आणि इंटरनेटवर प्रकाशझोतात आणतात.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या एका जाहिरातीमध्ये सुहानाचा आवाज ऐकू येत आहे. आता सुहाना तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday), शनाया (Shanaya) आणि सुहाना खानचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये या तिघी जबरदस्त मस्ती करताना दिसत आहे. सुहाना सोबतच तिचा लहान भाऊ असलेला अबराम देखील फोटोंमध्ये लक्ष वेधून घेत आहे.

अनन्या पांडे, शनाया आणि सुहाना खान लहानपणापासूनच एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असून त्यांना सतत सोबतच पाहिले गेले. प्रत्येक गोष्ट या तिघी धुमधडाक्यात साजऱ्या करताना दिसतात. नुकत्याच साजऱ्या झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या तिघी मजा मस्ती करताना दिसल्या. शनाया कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या तिघी स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिघींचाही ग्लॅमरस अंदाज सर्वांनाच आकर्षित करून घेत असून, सुहाना या व्हिडिओमध्ये लक्षवेधक ठरत आहे.

या तिघींच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल सांगायचे झाले तर लवकरच शनाया कपूर करण जोहरच्या ‘बेधडक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणात आहे. या सिनेमाचे काही दिवसांपूर्वीच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. शनाया ही अभिनेता संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी आहे. तर अनन्या पांडेने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. नुकताच तिचा दीपिका पदुकोणसोबतचा ‘गेहराइया’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. सुहाना खांबद्दल सांगायचे झाले तर तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल आतापर्यंत खूपच अफवा ऐकायला आल्या. सुहानाला अभिनयात रस असल्याचे खुद्द शाहरुख खाननेच सांगितले होते. मात्र ती पदार्पण कधी करणार याबद्दल अजून कोणतीच ठोस माहिती समोर आली नाही.

हेही वाचा 

हे देखील वाचा