‘असा चित्रपट बनवायला फक्त…’, ‘विक्रांत रोना’ पाहिल्यानंतर काय म्हणाले एसएस राजामौली?

कन्नड स्टार किच्चा सुदीपचा (Kiccha Sudeepa) ‘विक्रांत रोणा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. चित्रपटाने दोन दिवसांत ३८ कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला समीक्षकांसह सेलिब्रिटींचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनीही ‘विक्रांत रोणा’चे कौतुक करत, त्याला ‘उत्कृष्ट’ म्हटले आहे. यासोबतच त्यांनी सुदीपचे यशाबद्दल अभिनंदनही केले आहे.

राजामौली यांनी रविवारी ट्विटरवर लिहिले, ‘विक्रांत रोणाच्या यशाबद्दल किचा सुदीपचे अभिनंदन. अशा चित्रपटात गुंतवणूक करण्यासाठी धैर्य आणि विश्वास लागतो. तुम्ही गुंतवणूक केली आणि आता तुम्हाला ते परत मिळत आहे. चित्रपटाचा प्रीक्लाइमॅक्स जबरदस्त होता. (ss rajamouli watched kiccha sudeep vikrant rona and reacted)

राजामौली यांनी २०१२ मध्ये ‘ईगा’ चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये किच्चा सुदीपने नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याच वेळी, तो २०१५च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘बाहुबली: द बिगिनिंग’मध्ये एका छोट्या भूमिकेत दिसला. राजामौलीचे कौतुक पाहून सुदीपचे चाहते असा अंदाज लावत आहेत की, दोघे लवकरच एका नवीन प्रोजेक्टवर एकत्र काम करतील. राजामौली यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.

विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन अनूप भंडारी यांनी केले आहे. या चित्रपटात निरुप भंडारी, नीता अशोक आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ९५ कोटींच्या बजेटसह आतापर्यंतच्या सर्वात महागड्या कन्नड चित्रपटांपैकी एक आहे. २९ जुलै रोजी रिलीझ झाल्यानंतर, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

Latest Post