‘त्या’ धमकीमुळे सलमान ‘विक्रांत रोणा’च्या ट्रेलर लाँचला गैरहजर, किच्चा सुदीप म्हणाला, ‘भाईला सिनेमा…’

दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप याच्या ‘विक्रांत रोणा’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी (दि. २४ जून) मुंबईत लाँच झाला. या सिनेमाची निर्मिती सलमान खान याची प्रॉडक्शन कंपनी एसकेएफने केली आहे. असे म्हटले जात होते की, सलमानदेखील या सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान उपस्थित राहील. सलमान आणि सुदीपमधील नाते पाहून असे वाटत होते की, सलमान नक्की येईल. मात्र, असे काहीच झाले नाही. सलमानचे ट्रेलर लाँचला न येण्यामागील कारण सुदीपने सांगितले.

अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) म्हणाला की, प्रोटोकॉलनुसार सलमानला इथे येण्याची परवानगी मिळाली नाही. खरं तर, सलमान खान (Salman Khan) याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना एक धमकीचे पत्र मिळाले होते. यामध्ये त्यांना सिद्धू मुसेवालाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

किच्चा सुदीप आणि सलमान खान हे यापूर्वी ‘दबंग ३’ (Dabangg 3) या सिनेमातही एकत्र झळकले आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि सुदीपमध्ये चांगली मैत्री झाली होती. असे म्हटले जात आहे की, सुदीपने ‘दबंग ३’मध्ये काम करण्याच्या बदल्यात फी घेतली नव्हती. त्यानंतर सलमानने त्याला एक मर्सिडीज कार गिफ्ट केली होती. जेव्हा सलमानने सुदीपच्या ‘विक्रांत रोणा’ (Vikrant Rana) सिनेमा पाहिला, तेव्हा त्याला याचे व्हिज्युअल इफेक्ट्स खूपच आवडले आणि त्यानेच सुदीपला सल्ला दिला की, हा सिनेमा कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळमसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित केला पाहिजे. सल्ला देण्यासोबतच सलमान स्वत: या सिनेमाशी जोडला गेला असून तोच हा सिनेमा सादर करत आहे.

किच्ची सुदीपने सांगितले की, “गिव्ह अँड टेक यावर माझा विश्वास नाही. ‘दबंग ३’ च्या शूटिंगदरम्यान मी या सिनेमाबाबत सलमान भाईशी चर्चा केली होती. मग त्याला सिनेमाची संकल्पना खूप आवडली. जेव्हा संपूर्ण चित्रपट बनवला गेला आणि सलमान भाईला सिनेमा दाखवला, तेव्हा तो सिनेमा पाहून खूप प्रभावित झाले आणि म्हणाला की तुम्ही लोक असा सिनेमा कसा बनवता? ही त्याच्याकडून माझ्यासाठी मिळालेली एक खूप मोठी कौतुकाची थाप होती.”

‘विक्रांत रोणा’ या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हीदेखील आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post