Tuesday, April 16, 2024

अर्रर्र! एचडी प्रिंटमध्ये लीक झाला ‘विक्रांत रोणा’, किच्चा सुदीपसह निर्मात्यांनाही बसू शकतो झटका

साऊथ आणि बॉलिवूड हा वाद सुरू करणारा साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeepa) सध्या त्याच्या स्पाय ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘विक्रांत रोणा’मुळे चर्चेत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर, किच्चा सुदीपचा हा चित्रपट काल, म्हणजेच २८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘विक्रांत रोणा’ रुपेरी पडद्यावर  प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहे.

या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. चित्रपटाला पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये मिळालेल्या प्रतिसादानंतर, हा चित्रपट सुपरहिट होणार असे सर्वांना वाटत आहे. मात्र अशातच एक वाईट बातमी समोर येत आहे. या बातमीमुळे केवळ चाहत्यांनाच नाही, तर चित्रपटाच्या निर्मात्यांनाही मोठा धक्का बसू शकतो. (vikrant rona movie online leaked)

बहुप्रतिक्षित 3D चित्रपट ‘विक्रांत रोणा’ रिलीझ झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनूप भंडारी दिग्दर्शित हा चित्रपट अनेक पायरेटेड वेबसाइटवर एचडी प्रिंटमध्ये रिलीझ झाला आहे. या साइट्समध्ये तमिळ रॉकर्स, मूव्ही रुल्स आणि टोरेंट सारख्या नावांचा समावेश आहे. ही बातमी समोर येताच चित्रपटाच्या चाहत्यांना तसेच निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. कारण लीकचा थेट परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार आहे.

कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. किच्चा सुदीप आणि जॅकलिन फर्नांडिस स्टारर हा चित्रपट जवळपास ९५ कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. अशा परिस्थितीत, प्रचंड बजेट असलेल्या या चित्रपटासाठी बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी सुमारे १५० कोटींचा व्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे. आता हा चित्रपट कसा व्यवसाय करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अशाप्रकारे चित्रपट लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक चित्रपट आहेत, जे पायरसीच्या जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘गहराइयां’, ‘अतरंगी रे’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘आरआरआर’ यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. आजच्या युगात चित्रपटसृष्टीसाठी पायरसी ही मोठी समस्या बनली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा