स्टार प्रवाहवरील ‘या’ सौंदर्यवतींनी केला ‘नाटू नाटू’ ट्रेंड फॉलो, व्हिडिओला मिळतेय पसंती!


स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांना खूप आवडतात. प्रत्येक मालिकेला एक वेगळी स्टोरी आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील या मालिका आनंदाने पाहतात. मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडतात. अशातच स्टार प्रवाहवरील अभिनेत्रींचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले (Rupali Bhosale), ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे (Reshma Shinde), ‘या फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandha Maticha) मधील कीर्ती म्हणजेच समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) आणि ‘स्वाभिमान’ (Swabhiman) मालिकेतील पल्लवी म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) या अभिनेत्रींनी मिळून भन्नाट डान्स केला आहे. त्यांनी ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Natu Natu) या गाण्यावर डान्स केला आहे. (Star pravah actress dance on natu natu song, video viral on social media)

‘नाटू नाटू’ हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहे. या गाण्यावर अनेक कलाकारांनी त्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या चार अभिनेत्रींचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना हा डान्स व्हिडिओ खूप आवडला आहे. त्यांचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ एका पुरस्कार सोहळ्यातील आहे. ज्यात चौघींनीही नऊवारी साडी नेसली आहे. त्या ‘नाटू नाटू’ गाण्याचा डान्स स्टेप्स फॉलो करत आहेत.

स्टार प्रवाहवरील या चारही अभिनेत्री खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे सोशल मीडियावर देखील खूप चाहते आहेत. त्याच्या प्रत्येक पोस्टला त्यांचे चाहते पसंती दर्शवत असतात. रुपाली भोसले ही ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नकारात्मक भूमिकेत असली, तरी देखील तिला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!