कधी कधी सिनेमा हा एक सट्टाच वाटतो कारण या इंडस्ट्रीमध्ये यश मिळते, मात्र मेहनतीसोबतच नशिबाचीही साथ असणे खूपच महत्वाची असते. या क्षेत्रात अनेक कलाकार येतात, प्रतिभेच्या जोरावर कलाकार सिनेमा मिळवतात, सिनेमा सुपरहिटही होतात, मात्र तरीही कलाकरांना याचा काहीही फायदा होत नाही. सिनेमे हिट होऊनही कलाकार मात्र फ्लॉप ठरतात. या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे सिनेमे खूपच हिट झाले. कलाकारही प्रसिद्ध झाले मात्र याचा त्यांच्या करिअरला काहीच फायदा झाला नाही. या लेखातून आपण जाणून घेऊया अशाच काही कलाकारांची नावे.
उदिता गोस्वामी
उदिताने २००३ साली पूजा भट्टच्या ‘पाप’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ती ‘जहर’ सिनेमात दिसली. ‘जहर’ सिनेमातून उदिताला खूप लोकप्रियता मिळाली. मात्र दुर्दैवाने तिला चांगले सिनेमेच मिळाले नाही. कदाचित तिला प्रमोशनच करता आले नाही. ती आधीही लाइमलाइटपासून दूर राहिली. त्यानंतर तिने दिग्दर्शक मोहित सुरीसोबत लग्न केले. आज उदिता दोन मुलींची आई झाली असून, लाइमलाईटपासून दूर आहे.
तुषार कपूर
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपार देखील असाच एक अभिनेता आहे. त्याच्या ‘मुझे कुछ कहना है’ या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र त्याला त्याच्या वडिलांसारखे आभाळाएवढे यश मिळाले नाही. त्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम मिळाले. सातत्याने फ्लॉप सिनेमे दिल्यामुळे सध्या तो साइड भूमिकांमध्ये दिसतो.
डिनो मोरिया
डिनो मोरिया हँडसम हंक म्हणून ओळखला जायचा. त्याने १९९९ साली ‘प्यार मैं कभी कभी’ सिनेमातून सिनेमांमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तो २००० साली सुपरहिट ‘राज’ सिनेमात दिसला. त्यानंतर त्याचा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. अनेक सिनेमांमध्ये तो सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसला.
मधु
‘फूल और कांटे’ या हिट सिनेमातून मधूने अजय देवगणसोबत सिनेसृष्टीमधे पदार्पण केले. मधू ही हेमा मालिनी यांची पुतणी आणि जुही चावलाची वहिनी आहे. मधूने हिंदीसोबतच मल्याळम, कन्नड आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केले आहे. तिला ‘फूल और कांटे’ सिनेमातून खूप लोकप्रियता मिळाली. मधूने मणिरत्नम यांच्या ‘रोजा’ सिनेमातही काम केले आहे.
रिमी सेनबंगाली ब्युटी असणारी रिमी सेन बॉलिवूडमध्ये खूपच मोठे करिअर करेल असे वाटत होते. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करत हिट सिनेमे दिले, मात्र तरीही तिचे करिअर चालले नाही. रिमी ‘बिग बॉस’मध्ये देखील दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-… म्हणुन श्रीदेवीला झाडामागे बदलावे लागायचे कपडे; अभिनेत्रीने स्वत: केला होता खुलासा