हॉलिवूड अभिनेते स्टीफन डोर्फ यांनी अभिनेत्री स्कारलेट जोहानसनला घेऊन एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे सर्वच फॅन्सला धक्का बसला आहे. स्टीफनने सांगितले की, ते स्कारलेट जोहानसन खूपच निराश झाले आहेत, कारण तिला ब्लॅक विडो सारख्या कचरा सिनेमात काम करावे लागले. ‘ब्लॅक विडो’ हा मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा सिनेमा होता जो ९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हॉलिवूड मधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते असणारे स्टीफन डोर्फ यांनी सांगितले की, त्यांना अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम करायचे आहे.
https://www.instagram.com/p/CWlLERfoEj-/?utm_source=ig_web_copy_link
स्टीफन यांनी सांगितले की, “मला आता देखील चांगल्या चित्रपटांमध्ये काम करायचे आहे. मी आज देखील स्क्रिप्ट वाचतो. कारण मला ‘ब्लॅक विडो’ सारख्या चित्रपटात काम नाही करायचे.” एका मोठ्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “ब्लॅक विडो सारख्या कचरा असलेला सिनेमात मला काम करायचे नाही. हा सिनेमा एका बालिश व्हिडिओ गेमसारखा होता. मी त्या सर्व लोकांसाठी नाराज आज. मी स्कारलेट साठी खूप नाराज आहे. मला वाटते की, तिला ५,७ मिलियन मिळाले असतील. मात्र मी अशा चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाही. यापेक्षा एखादा नवखा कोणी सिनेमा दिग्दर्शित करत असेल तर मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल.
पुढे स्टीफन म्हणाले, “मी कधीही सुरक्षित खेळ खेळू इच्छित नाही. माझ्यासाठी हॉलिवूड नेहमीच सुरक्षित राहिले. जेव्हा मला पैशांची गरज असते, तेव्हा मी नक्कीच अशा चित्रपटांमध्ये काम केले जिथे मला करायचे नव्हते. मला पैसे देखील पाहिजे कारण मला माझ्या गरजा पूर्ण करायच्या आहेत.”
स्टीफन डोर्फ यांनी ‘स्पेस ट्रकर्स’, ‘ब्लेड’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी सोफिया कोपोला की ‘समवेयर’ने २०२० साली कमबॅक केले. याशिवाय त्यांनी ‘एचेबीओ के ट्रयू डिटेक्टिव’च्या तिसऱ्या सीझनमध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती
-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा
-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…










