गोंडस जोडपं! जेव्हा जीभ काढून अनुष्काला चिडवताना दिसला होता विराट; मजेशीर अंदाजाला चाहत्यांची पसंती


बॉलिवूड आणि क्रिकेटचं खूप जुनं नातं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपली जीवनसाथी म्हणून निवडले आहे. यात मन्सूर अली खान पतौडी- शर्मिला टागोर, युवराज सिंग- हेजल कीच आणि विराट कोहली- अनुष्का शर्मा यांसारख्या जोड्यांचा समावेश आहे. विराट आणि अनुष्का या गोंडस जोडप्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्यावर चाहते अक्षरश: जीव ओवाळून टाकतात. केवळ ऑनस्क्रीनच नव्हे, तर ऑफस्क्रीनदेखील या जोडीला भरभरून प्रेम मिळते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. अशातच आता दोघांच्या व्हायरल होत असलेल्या एका थ्रोबॅक फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सन २०१८ मधील जाहिरात
खरं तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो एका जाहिरातीदरम्यानचा आहे. या फोटोत विराट कोहलीचा अतिशय मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. तो जीभ काढत अनुष्काला चिडवत आहे आणि तीदेखील लाजताना दिसत आहे. त्यांचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. (Story A Fan Club of Virat Kohli And Actress Anushka Sharma Has Shared A Throwback Candid Picture)

अनुष्काचे प्रोजेक्ट्स
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २००८ मध्ये शाहरुख खानसोबत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती शेवटची सन २०१८ मध्ये आलेल्या ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख आणि कॅटरिना कैफसोबत झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. सध्या ती आपल्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये व्यस्त आहे. तिच्या प्रॉडक्शनचा ‘बुलबुल’ चित्रपट आणि ‘पाताल लोक’ वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते.

विशेष म्हणजे सन २०१३ मध्ये विरुष्काच्या म्हणजेच विराट आणि अनुष्काच्या लव्हस्टोरीलादेखील एका शूटिंगदरम्यानच सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी ११ डिसेंबर, २०१७ मध्ये लग्न केले होते. यावर्षी म्हणजेच ११ जानेवारी, २०२१ रोजी हे जोडपे आई- वडील बनले होते. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.