‘बेडवर असे पडून राहा!’ प्राजक्ता माळीच्या फोटोसोबतच मजेदार कॅप्शनवरही रंगल्या चर्चा


मराठमोळी प्राजक्ता माळी ही चाहत्यांमध्ये खासकरून तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. अभिनेत्री, फोटोशूट्सने तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून, ती तिच्या उत्कृष्ट फॅशन स्टेटमेंटद्वारे चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर ती दरदिवशी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. त्यातलाच एक फोटो आणि त्याच्या खालचे मजेदार कॅप्शन चर्चेत आले आहे.

प्राजक्ताने तिच्या या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे तिच्या फॅशन स्टेटमेंटचं दर्शन घडत आहे. यामध्ये तिची स्टाईल अगदी पाहण्यासारखी आहे. तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे तिने स्टायलिश पद्धतीने नऊवारी साडी नेसली आहे.

हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोला नेटकरी भरभरून प्रेम देत आहेत. फोटोसोबतच याचं लक्षवेधी कॅप्शनही चांगलंच चर्चेत आलं आहे. हे फोटो शेअर करत प्राजक्ताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “आज बेडवर असे पडून राहा.” हे मजेदार कॅप्शनही चाहत्यांनी पसंत केलं आहे.

प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कॉमेडी शो होस्ट करत आहे. तसेच तिने काही महिन्यांपूर्वी ‘लकडाउन’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग जुन्नरमध्ये पार पडले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.