‘तुझी प्रत्येक गोष्ट आवडते!’ म्हणत सिद्धार्थ चांदेकरने मितालीसाठी शेअर केली रोमँटिक पोस्ट


अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे सोशल मीडियावर सक्रिय राहणारं जोडपं आहे. त्यांच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी ते चाहत्यांसोबत शेअर करणे पसंत करतात. काही महिन्यांपूर्वी हे जोडपं रेशीमगाठीत अडकलं आहे. तेव्हापासूनच ते सतत चर्चेत येत असतात. त्यांच्यामधील रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना भावते. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमधून तर त्यांच्या प्रेमाचं दर्शन होतंच असतं, मात्र सिद्धार्थने नुकतीच एक अतिशय रोमँटिक अशी पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून मिताली देखील नव्याने त्याच्या प्रेमात पडली असेल.

‘तुझी प्रत्येक गोष्ट आवडते’, असं म्हणत सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला आवडतं. पाणी पिता पिता चुकून अंगावर सांडलं की एक केविलवाणा चेहरा करतेस, तो खूप आवडतो. तंद्रीत असताना काहीतरी विसरलेलं अचानक आठवतं तुला. ते सांगताना जो उत्साह असतो तुझा तो खूप आवडतो. थकलेली असतेस, डोळ्यात झोप असते, तरी…’भूक लागलीय? काही देऊ करून पटकन?’ हे विचारताना तुझ्या डोळ्यात जे प्रेम दिसतं ते खूप आवडतं.”

पुढे त्याने लिहिलं, “कुणी तुझी मस्करी केली की, एक बिचारा, रुसलेला चेहरा करतेस, तो तर खूप आवडतो. मी बोलत असताना टक लावून बघतेस, तेव्हा दोन शब्द विसरूनच जातो एकदम. कारण बोलण्यापेक्षा ते डोळे बघत राहायला फार आवडतं. गाडीत बसून जाताना नजरेआड व्हायच्या आधी माझ्याकडे पाहतेस, तेव्हा धावत त्या गाडी मागे यावसं वाटतं. तुझ्याकडे पाहत बसलो असताना, जेव्हा तू पकडतेस तेव्हा मान हळूच हलवून ‘काय रे?’ विचारतेस ना…ते तर फार आवडतं. खरं सांगू? तुझा चिडलेला चेहरा पण आवडतो, सॉरी पण रडताना पण सुंदर दिसतेस… खरच. तू हसत असताना तुझ्याकडे पाहायला फार आवडतं.” (siddharth chandekar wrote romantic post for wife mitali mayekar)

ही पोस्ट पाहून मिताली देखील प्रचंड खुश झाली आहे. तिने या पोस्टवर कमेंट करत तिचे प्रेम व्यक्त केले आहे. शिवाय काही कलाकारांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.