Saturday, June 29, 2024

नर्गिसची मुलाखत घेताना दत्त साहेबांच्या तोंडातून का फुटला नव्हता एकही शब्द? तुम्हालाही आवडेल किस्सा

रस्त्यावर चालताना, विमानातून प्रवास करताना, एखाद्या पार्टीत, या आणि अशा बऱ्याच प्रकारे कलाकारांना एकमेकांच्या प्रेमात पडताना आपण पाहिलंच आहे, पण मंडळी इंडस्ट्रीत असे एक जोडपे होते, जे सिनेमाची शूटिंग करतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आता तुम्ही म्हणाल, सिनेमाच्या शूटिंगवेळी तर कलाकार एकमेकांच्या प्रेमात अनेकवेळा पडलेत त्यात काय एवढं. होय, पण थांबा, आज आपण ज्या कलाकार जोडीच्या प्रेमाबद्दल बोलणार आहोत, त्यांचा विषय जरा वेगळाच आहे. आपण बोलत आहोत दिग्गज कलाकार जोडी सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांच्याबद्दल. जेव्हा पहिल्यांदा सुनील दत्त नर्गिस यांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता. चला जाणून घेऊया तो किस्सा.

चाळीस अन् पन्नासच्या दशकात नर्गिस आणि राज कपूर 16 सिनेमात एकत्र झळकले होते. त्यांच्या दोघांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चाही जोर धरून होत्या. त्यावेळी राज कपूर यांचे लग्न झालेलं नर्गिस यांना चांगलंच माहिती होतं, पण तरीही नर्गिस यांनी आरके प्रॉडक्शनच्या सर्व सिनेमे साईन केलेले. राज कपूर यांची दुसरी पत्नी होण्यासाठीही त्या तयार झाल्या होत्या, पण राज कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडण्यास थेट नकार दिला.

राज कपूरमुळे नर्गिस यांच्या आयुष्याची गाडी रुळावरून उतरत होती. त्या पूर्णपणे तुटल्या होत्या, नैराश्यात गेल्या होत्या, पण तेव्हाच एन्ट्री झाली सुनील दत्त यांची. तसं तर सुनील दत्त नर्गिस यांचे खूप चांगले मित्र होते, परंतु पहिल्या नजरेतच ते नर्गिस यांच्या प्रेमात पडले होते. मात्र, त्यांनी नर्गिसला हे कधीच सांगितलं नव्हतं.

असं म्हणतात की, सुनील दत्त यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली होती. ते जेव्हा सिलोन रेडिओमध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करत असायचे, तेव्हा पहिल्यांदा नर्गिस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती. इथेच त्यांना नर्गिसची मुलाखत घेण्याचं काम सोपविण्यात आलं होतं. अभिनेता सुनील दत्त यांचा त्यावेळी अभिनयाशी काहीही संबंध नव्हता. पण त्याचवेळी, नर्गिस यशस्वी अभिनेत्री म्हणून लोकांच्या मनावर राज्य करत होत्या. सुनील दत्त यांनी जेव्हा पहिल्यांदा नर्गिस यांना पाहिलं, तेव्हा ते त्यांना एक प्रश्नही विचारू शकले नाहीत. कसे विचारणार ना. त्याकाळची एवढी प्रसिद्ध अभिनेत्री आपल्यासमोर आहे, म्हणल्यावर कुणाच्या तोंडून शब्द बाहेर पडतील, पण हे खरंय. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची नोकरीही जाता जाता वाचली होती.

यानंतर या दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. ती सिनेमाच्या सेटवर. सिनेमा होता 1956 सालचा ‘मदर इंडिया.’ मेहबूब खान यांच्या ‘मदर इंडिया’ या सिनेमामध्ये सुनील दत्त आणि नर्गिस एकत्र काम करत होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक घटना घडली, ज्याने या दोघांना कायमचे एकमेकांच्या जवळ आणले.

‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या एक सीन शूट करण्यासाठी सेटवर आग लावण्यात आली होती. आग हळूहळू तीव्र झाली आणि नर्गिस त्या आगीत अडकल्या. सुनील दत्त यांनी त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता, नर्गिसला वाचवण्यासाठी आगीत उडी मारली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. ते इतक्या वाईट प्रकारे जळाले गेले की, ते पुन्हा पुन्हा बेशुद्ध होऊ लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे नर्गिसने दिवस-रात्र त्यांची काळजी घेतली. या घटनेनंतर नर्गिस आणि सुनील दत्त यांनी एकमेकांना पत्र लिहून आपलं प्रेम व्यक्त केलं.

त्यानंतर नर्गिस आणि सुनील दत्त यांनी 1958 साली लग्न झालं. त्यांना संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त अशी तीन मुलेही या जोडप्याला झाली.(story about nargis and sunil dutt love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते अन् वास्तवात…’, करीना कपूर का हाेतेय ट्राेल? लगेच वाचा
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

हे देखील वाचा