देशाच्या प्रत्येक भागात कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. अशा परिस्थितीत रोज लाखो प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. कोरोना संसर्गामुळे बर्याच लोकांचा बळी जात आहे. त्यादरम्यान, मनुष्यासाठी जर कोणी देवाप्रमाणे उभे असेल, तर ते डॉक्टर आणि फ्रंटलाइन कामगार आहेत. पण कॉमेडियन सुनील पाल नुकताच डॉक्टरांबद्दल काहीतरी बोलला आहे, ज्यामुळे त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी डॉक्टर जिवाच्या आकांताने दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत, कॉमेडियन सुनील पालला डॉक्टरांबद्दल अपशब्द बोलणे महागात पडले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुनीलने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये, त्याने ९० टक्के डॉक्टरांना चोर आणि सैतान म्हटले होते. या व्हिडिओवरून सुनीलविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
डॉक्टरांनी नोंदविली तक्रार
असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स मुंबईने, ४ मे रोजी सुनील पालविरोधात तक्रार दाखल केली आहे. असोसिएशनच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांनी एफआयआरमध्ये लिहिले आहे की, “स्टँड-अप कॉमेडियनने यूट्यूबच्या मुलाखतीत डॉक्टरांवर खोटे आरोप केले आहेत.”
व्हिडिओमध्ये ‘असं’ बोलला होता सुनील
माध्यमातील वृत्तानुसार, सुनील पालने एप्रिलमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सुनील म्हटला होता की, “कोव्हिड- १९ रूग्णांवर उपचार करणारे ९०% डॉक्टर हे फसवे आणि सैतान आहेत. ते लोकांकडून भरमसाठ फी घेऊन, त्यांची लूट करत आहेत. मी असेही ऐकले आहे की, ते रुग्णांच्या शरीरातून अवयव चोरून त्यांना ठार मारत आहेत. याशिवाय, ज्यांना कोव्हिड झालेला नाही, त्यांचादेखील खोटा सकारात्मक अहवाल देत आहेत. यात टोळ्यांचा समावेश आहे. माझ्या मते या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-