इंस्टाग्रामकडूनही कंगना रणौतला ‘दणका!’ हटविण्यात आली ‘ही’ पोस्ट, म्हणाली…

story kangana ranaut post deleted by instagram she share tested covid 19 positive


अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद एकत्रच चालत असतात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तिचे ट्विटर अकाउंट अलीकडेच निलंबित करण्यात आले होते. ज्यानंतर ती आता इंस्टाग्रामवर बरीच सक्रिय झाली आहे. नुकतीच कंगनाची एक पोस्ट तिच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामकडून हटविण्यात आली आहे.

खरं तर, शनिवारी (८ मे) कंगनाने एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले होते की, तिला कोव्हिडची लागण झाली आहे. यावेळी कोरोनाचे वर्णन तिने किरकोळ फ्लू म्हणून केले. तिच्या या पोस्टवर विवाद होऊ लागला, त्यामुळे इंस्टाग्रामने हे पाऊल उचलले आहे.

इंस्टा स्टोरीद्वारे दिली माहिती
कंगनाने इंस्टा स्टोरीवर ही माहिती दिली आहे. तिने लिहिले आहे, “इंस्टाग्रामने माझी एक पोस्ट हटवली आहे, ज्यामध्ये मी कोव्हिडला संपवण्याची धमकी दिली होती. याने कोणाच्या तरी भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणजेच ट्विटरवर अतिरेकी आणि कम्युनिस्टांची सहानुभूती ऐकली आहे, परंतु आता कोव्हिड फॅन क्लबही! अप्रतिम. इंस्टावर दोन दिवस झाले आहेत, परंतु असे वाटत नाही, की मी इथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकू शकेल.”

या पोस्टमुळे झाला होता वाद
कंगनाने लिहिले होते, “गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखे वाटत होते आणि माझ्या डोळ्यांतही हलकी जळजळ होत होती. हिमाचलला जाण्याच्या आशेने काल मी माझी चाचणी करून घेतली होती आणि आज त्याचा निकाल आला आहे. मी कोव्हिड पॉझिटिव्ह आहे. यामुळे मी स्वत: ला विलगिकरणात ठेवले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, याची मला कल्पना नव्हती. आता मला माहित आहे की, मी याला संपवणार आहे.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “जर तुम्ही घाबरलात, तर तो तुम्हाला अधिक घाबरवेल. चला या कोव्हिड- १९ ला संपवूया. हा किरकोळ फ्लूशिवाय काही नाही. हर हर महादेव.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू एक हिरो आहेस’, अभिनेत्री सारा अली खानने केलेल्या ‘या’ कामामुळे सोनू सूदेकडून प्रशंसा

-ढोल ट्विस्टसोबत व्हायरल झाले रवीना टंडनचे ‘टिप टिप बरसा पाणी’ गाणे, अभिनेत्रीनेही व्हिडिओ केला शेअर

-श्वास रोखून धरा! तब्बल १०० कोटी रुपये घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ करणार बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री


Leave A Reply

Your email address will not be published.