Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘इतक्या लहानपणी गायनाला केली होती सुरुवात,’ बालपणीचा फोटो शेअर करत नेहा कक्करने लिहिले भावनिक कॅप्शन

‘इतक्या लहानपणी गायनाला केली होती सुरुवात,’ बालपणीचा फोटो शेअर करत नेहा कक्करने लिहिले भावनिक कॅप्शन

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आज रसिकांच्या मनावर राज्य करते. मात्र, नेहाने आजच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. इतकेच नाही, तर तिने बालपणात खूप संघर्ष केला आहे आणि हेच कारण आहे की, इतकी लोकप्रियता मिळवल्यानंतरही, ती अजूनही मातीशी जोडलेली आहे.

व्हायरल होतोय बालपणीचा फोटो
बॉलिवूड इंडस्ट्रीची सेन्सेशन नेहा कक्करच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गोंडस नेहा हातात माईक घेऊन, गाणे गाताना दिसत आहे. हा फोटो गायिकेने स्वतः आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

पाहायला मिळाले पूर्ण कक्कर कुटुंब
नेहाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिच्याव्यतिरिक्त संपूर्ण कक्कर कुटुंब स्टेजवर बसलेले दिसत आहे. फोटोमध्ये तिचा भाऊ टोनी कक्करही पालकांसमवेत लाल स्वेटर घालून, हातात माईक घेऊन बसलेला दिसत आहे. या फोटोसोबत नेहाने आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या गुरूसोबत दिसली आहे. नेहा कक्करचे हे दोन्ही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/COcTjnqj2iR/?utm_source=ig_web_copy_link

भावनिक आहे कॅप्शन
हे फोटो शेअर करत नेहाने भावनिक कॅप्शन दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, गायन सुरू केले तेव्हा मी किती छोटी होते. फक्त मीच नाही, तर तुम्ही टोनीला देखील आईच्या समोर बसलेला पाहू शकता आणि बाबा त्यांच्या शेजारी बसलेले आहेत. ते म्हणतात ना की, ‘कठोर परिश्रम खरे असतात.’ आमच्या बाबतीत हे खरोखरच वास्तविक झाले आहे. आम्ही कक्कर एक अभिमानी कुटुंब आहोत.”

दुसर्‍या फोटोचे वर्णन करताना नेहाने पुढे लिहिले की, “तथापि, जेव्हा तुम्ही उजवीकडे स्वाईप कराल, तेव्हा एका सुंदर माणसाबरोबर माझा सध्याचा फोटो दिसेल. त्यांनीच माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर फोटो माझ्या हातात ठेवले आहेत. धन्यवाद सर, तुम्ही मला हे अत्यंत मौल्यवान फोटो दिले आणि मला अधिक कष्ट करण्याची शक्ती दिली. जय माता दी.”

खूप दारिद्र्य पाहिलंय
एका मुलाखतीदरम्यान नेहाने स्वतः सांगितले होते की, तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी खूप दारिद्र्य पाहिले आहे. कुटुंब चालवण्यासाठी नेहाचे वडील, तिची बहीण सोनूच्या कॉलेजबाहेर समोसा विकत असत. एवढेच नव्हे, तर नेहा कक्कर बालपणी स्वत: जगरातामध्ये भजन गात असायची.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कधीही न विसरता येणारा!’ अल्लू अर्जुनच्या चिमुकलीने त्याच्यासाठी बनवला ‘खास डोसा’, कोरोना पॉझिटिव्हनंतर घरातच आहे क्वारंटाईन

-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

हे देखील वाचा