‘तेरे नाम’ मुळे रातोरात भारतातील घराघरांत ‘भूमिका’चे नाव पोहचले, परंतू पुढे वेळच अशी आली की…


एक काळ होता की सलमान खानचा चित्रपट ‘ तेरे नाम ‘ चा परिणाम प्रत्येक तरुणावर झाला होता. या चित्रपटात निर्जराची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री ‘ भूमिका चावला ‘ भले ही आज सिल्व्हर स्क्रीनवरुन गायब झाली आहे , तरीही त्याकाळी सलमान खान सोबत एकच सुपरहिट चित्रपट करून ती रातोरात स्टार बनली होती. या चित्रपटात सलमान खान हा भूमिकाचा प्रेमात वेडा होऊन जीव देण्यास निघाला होता. भूमिकाची ही भूमिका तुफान गाजली होती. भारतातील अनेक प्रेमवीरांच्या घरात भूमिकाचा पोस्टर होता. परंतू त्यानंतर ती फारसी कुठे दिसली नाही. अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना माहीत असेल की ही अभिनेत्री सध्या करतेय तरी काय? चला तर मंडळी आज बोंबाबोंब टीम तुम्हाला भूमिका सध्या काय करतेय याबद्दल एकदम करेक्ट माहिती देणार आहे.

सध्या भूमिकाचे वय ४२ वर्ष असून तिचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ रोजी दिल्ली येथे झाला होता. ऑगस्ट २०२१मध्ये भूमिका आपला ४३ वा वाढदिवस साजरा करणार आहे. भूमिकाने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. पंजाबी घरात जन्मलेली भूमिकाने ‘ युवकुडू ‘ नावाच्या एका तेलगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरचा श्रीगणेशा केला.  त्यानंतर साऊथ चित्रपटातही तीला खूप लोकप्रियता मिळवली. त्याच काळात तिला बॉलिवूडमध्ये ‘तेरे नाम’ सिनेमाची ऑफर मिळाला. तेव्हा सलमान खान करियरमध्ये अडखळतच होता परंतू तो या सिनेमात अभिनेत्याची भूमिका साकारत होता.

सलमान आणि भूमिकाच्या या जोडीने अशी काही कमाल केली की, एका बाजूला चित्रपट सुपरहिट झाला आणि दुसऱ्या बाजूला भूमिकाची लोकप्रियता गगनाला पोहचली. हा चित्रपट त्या वर्षातला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. प्रेक्षकांनी सलमान खान सोबतच भूमिकांच्या अभिनयालाही तेवढीच दाद दिली होती. भूमिका अगदी रातोरात नॅशनल क्रश झाली होती.

त्यानंतर मात्र भूमिकाच्या करियरची गाडी सुसाट निघाली. तिला अनेक हिंदी सिनेमांच्या ऑफर आल्या. २००४मध्ये तीने बीग बींचा अभिनयात नुकतच पदार्पण केलेला पुत्र अभिषेकबरोबर रण नावाचा सिनेमा केला. चित्रपट प्रदर्शनापुर्वी चित्रपटाची खूप चर्चा झाली परंतू हा सिनेमा सपशेल पडला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा विशेष काही करु शकला नाही.

या अपयशानंतर भूमिकाला पुन्हा एकदा सलमान खान सोबत ‘सिलसिले’ आणि ‘दिलं जो भी कहे’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली .परंतु दोन्हीही चित्रपट खूप वाईट प्रकारे फ्लॉप झाले. त्यानंतर भूमिका तेलगू चित्रपटात काम करु लागली. गमतीचा भाग म्हणजे तीने तिथे अनेक हिट सिनेमे दिले.

२००६ मध्ये भूमिकांच्या ‘सिल्लूनु ओरू कधाल ‘ या चित्रपटाने संपूर्ण चित्रपट जगतात धमला केली. याच दरम्यान भूमिकाने अनेक पंजाबी आणि साऊथ चित्रपटात देखील काम केले, जिथे तीला खूप यश मिळाले.

चित्रपटात सृष्टीत पदार्पण करण्यापुर्वी भूमिका योगा शिकत होती. ‘भरत ठाकूर’ हे तिच्या योगा टीचरचे नाव आहे. योगा शिकता शिकता भूमिका तिच्या टीचरचा प्रेमात पडली. जवळपास 4 वर्ष ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर भूमिकाने भरत सोबत लग्न केले.

भूमिका आणि भरतचे लग्न नाशिकच्या देवलानीच्या एका गुरुद्वारामध्ये झाले होते. लग्नाच्या 7 वर्षानंतर 2014 मध्ये भूमिका आणि भरत यांना एक मुलगा आहे. चित्रपट क्षेत्राबाहेरच्या व्यक्ती सोबत लग्न करणारी भूमिका तिच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत सुखी आहे आणि आता चित्रपटात खूप कमी पाहायला मिळते. एमएस धोनी सिनेमात तीने धोनीच्या बहीणीची भूमिका केली होती. त्यानंतर खामोशी व भ्रम या दोन हिंदी सिनेमात ती दिसली. ऑपरेशन मंजू नावाचा एक हिंदी सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असून त्यात ती दिसणार आहे. तब्बल ११ हिंदी सिनेमात काम करुन व मल्याळम, कन्नड, भोजपुरी, तेलगू आणि पंजाबी चित्रपटातही गाजवूनही बॉलीवूडच्या एकेवेळच्या या अभिनेत्रीला कधीच बॉलीवूडमध्ये बस्तान बसवता आले नाही.

 


Leave A Reply

Your email address will not be published.